संतोष मेश्राम चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- इन्फंट जीझस सोसायटी राजुरा द्वारा संचालित इन्फंट काँन्व्हेंट, राजुरा येथील इयत्ता १० वी तील विद्यार्थिनी प्रिन्सी विजय बऱई हिने १७ वर्षे मुलींच्या गटामध्ये जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावून सलग दुसऱ्यांदा राजुरा तालुक्याचे नाव उज्ज्वल केले आहे. तर आता ती विभागीय स्तरावर जिल्ह्य़ाचे नेतृत्व करणार आहे.
तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे संस्थापक माजी आमदार सुभाष धोटे, सचिव माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, संस्थेचे अध्यक्ष अभिजीत धोटे, मुख्याध्यापिका मंजुषा अलोने, मुख्याध्यापिका सिमरनकौर भंगू, मुख्याध्यापक रफिक अन्सारी, क्रीडा शिक्षक पुंडलिक वाघमारे, हर्षल क्षिरसागर यासह शाळेच्या सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी, पालक व विद्यार्थ्यांनी तिचे हार्दिक अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

