हिंगणघाट व समुद्रपूर तालुक्यातील नुकसानीची माजी आमदार राजु तिमांडे यांनी केली पाहणी.
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- चालू हंगामात सोयाबीनवर आलेल्या विविध रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे निस्तनाभुत झालेल्या पिकाची केंद्र व राज्य सरकारने पाहणी करून शेतक-यांना आर्थिक मदत देण्याबाबत तसेच सतत धार पावसामुळे कपासीचे पिक धोक्यात आले असुन पिकाचे सर्व्हेक्षण करून मदत देण्यासंबंधी माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांच्यासह शेतकऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, कृषीमंत्री शिवराजसिंग चौव्हाण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जिल्हाधिकारी वर्धा यांना उपविभागीय अधिकारी मार्फत निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली.
हिंगणघाट व समुद्रपूर तालुक्यातील कपाशीचे तसेच सोयाबीन वर आलेल्या रोगांची माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी शेतामध्ये जाऊन झालेल्या नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत या संपूर्ण मागणीचे निवेदन शासनाला दिले. यावेळी साहेबराव धोटे, अमोल लाजूरकर, जयप्रकाश चंदेल, मोरेश्वर वाघमारे, प्रकाश कांबळे, देविदास साबळे इत्यादी उपस्थित होते.
चालु हंगामात सोयाबीनवर आलेल्या विविध रोगाच्या प्रादुर्भावाने सोयाबीनचे पिक धोक्यात आले असुन शेतकरी हवालदील होणाच्या मार्गावर आहे. सोयाबीनवर येलो मोझॅक रोग आला असुन पान पिवळी पडली असुन लागलेल्या शेंगा सुकु लागत्या आहे. सोयाबीनच्या झाडाला शेंगा लागल्या असुन पिवळया पडुन सुकत आहे. शेंगा सपाट झाल्या असुन त्यात दाण्याचा जिव मेला आहे. त्यामुळे सोयाबीनचा एकरी १ किलो सुध्दा उतारा येणार नाही अशी गंभीर स्थिती शेतक-यांची झाली आहे. सोयाबीनचे पिक सुकु लागल्याने काही भागातील शेतक-यांचे शेतात जनावरे सोडली आहे. शेतक-यांचे मुख्य पिक सोयाबीन असल्यामुळे ऐन दिवाळीच्या तोंडावर अंधकारमय चाकोरीतुन वाटचाल करीत आहे.
तरी केंद्र व राज्य सरकारने कृषी विभागाच्या टिम कडुन सर्व्हे करावा व शेतक-यांना आर्थिक मदत देण्यात यावी. तसेच शेतक-यांचे दुसरे महत्वाचे कपासीचे पिक सततधार पावसामुळे धोक्यात आले असुन पाती, बोंडे बुरशीमुळे गळुन पडली आहे. सष्टेंबर महिना हा पावसाचा सांगितला असुन त्याचा फटका कपासीच्या पिकाला आहे. त्यामध्ये हिंगणघाट तालुक्यामधील सोतफळ, बुरकोनी, लाडकी, काजळसरा, नरसाळा, सेलु, मुरपाड, पिंपळगांव, कडाजना, सुलतानपुर, उमरी, सावली (वाघ), बोपापुर, पोहणा, आजनसरा, हिवरा, फुकटा, पिपरी, वणी, जांगोणा, धोची, येरला, वडनेर, सास्ती, हडस्ती, टिवरी पिपरी, धानोरा, शेकापुर, दोंदुडा, बांबर्डा, वाघोली, वेळा, किनगांव, तसेच समुद्रपुर तालुक्यातील खंडाळा, नारायणपुर, हळदगांव, तांभारी, चाकुर, कांढळी, कानकटी, बरबडी, रामनगर, मदरा, वायगांव गोंड, उमरी, राळेगांव, धामणगांव, कुरसापार, मांडगांव, साखरा, तळोदी, मंगरूळ, ताळगांव, वानरचुआ, रासा गोणसा, पिपरी, पिंपळगांव, कोरा, चिखली, नारायणपुर, खापरी, उसेगांव, चापापुर, गिरगांव, झुनका रूनका, निंभा, कवठा, आरंभा, लोणार, तास, परडा, नंदोरी, वासी, सावंगी झाडे, किन्ही रूनका, नारायणपुर, गणेशपुर, ईत्यादि परिसरातील सोयाबीनचे व कापसाचे पिक निस्तेनाभूत झालेले आहे अशी गंभीर परिस्थिती संपूर्ण तालुक्यात निर्माण झाली आहे. तरी शासनाने सर्व पिकांचा सर्व्हे करून शेतक-यांना आर्थिक मदत दयावी अशी मागणी माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांच्यासह शेतकऱ्यांच्या वतीने शासनाला निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

