मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- विधानसभा क्षेत्रात दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे आणि येलो मोजॅक रोगामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सोयाबीन,कपाशी व तुरीसारखी मुख्य पिके उद्ध्वस्त झाली असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार पक्ष) तर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हिंगणघाट उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शेकडो नेते पदाधिकारी कार्यकर्ते महिला उपस्थित होत्या.
मागण्या पुढीलप्रमाणे :
@ हिंगणघाट विधानसभा क्षेत्र ओला दुष्काळग्रस्त घोषित करावे.
@ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तात्काळ पंचनामे करून मदत करावी.
@ सोयाबीन, कपाशी व तुरी पिकाच्या नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये आर्थिक मदत द्यावी.

