संतोष मेश्राम चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- इन्फंट जीजस सोसायटी द्वारा संचालित इन्फंट जीजस इंग्लिश हायस्कूल राजुराच्या इयत्ता ८ विच्या विद्यार्थ्यांनी बँक ऑफ महाराष्ट्र ची भेट घेऊन प्रत्यक्ष अनुभव घेत व्यवहारीक शिक्षणाचे धडे गिरवले. यावेळी बँक ऑफ महाराष्ट्र चे राजुरा शाखा व्यवस्थापक हरी कुमार वेल्पुला, व्यवस्थापक अक्षय चौधरी, सहाय्यक व्यवस्थापक स्वाती दुढे, लिपिक मोनिका कोवे यांनी बँकेच्या कार्यप्रणाली संदर्भात सेव्हिंग अकाउंट फिक्स डिपॉसिट, करंट अकाउंट, हाउसिंग लोन, गोल्ड लोनसह विविध माहिती मुलाना सविस्तर दिली.
यावेळी इन्फन्ट कॉन्व्हेन्टचे शिक्षक सौ. सोनाली कल्लुरवार, शोएब शेख यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

