स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीला लागा: आमदार समीर कुणावार
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- भारतीय जनता पार्टी हिंगणघाट शहर व ग्रामीणच्या वतीने स्थानिक निखाडे भवनात मंडळ कार्यकारीणी बैठक व कार्यशाळा आज दिनांक १९ रोजी संपन्न झाली. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आमदार समीर कुणावार होते. यावेळी व्यासपीठावर जेष्ठ भाजप नेते वसंतराव आंबटकर, भाजपा जिल्हा महामंत्री कमलाकरजी निंबोळकर, आकाश पोहाणे, भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अंकुश ठाकूर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रफुल्ल बाडे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष स्नेहल कलोडे, भाजपा जिल्हा उपाध्यक्षा छायाताई सातपुते, अनुसूचित जमाती जिल्हाध्यक्ष शंकर आत्राम, भटके विमुक्त आघाडी जिल्हाध्यक्ष प्रल्हाद दांडगे, विधानसभा प्रमुख संजय डेहणे, हिंगणघाट ग्रामीण तालुका अध्यक्ष विनोद विटाळे, विधानसभा प्रमुख वामन चंदनखेडे, भाजपा जिल्हा सचिव तुषार आंबटकर, माजी नगराध्यक्ष प्रेम बसंतानी, भाजपा शहराध्यक्ष भूषण पिसे, कार्याध्यक्ष संजय माडे, प्रा. किरण वैद्य, महिला विधानसभा प्रमुख नलिनी सयाम, अनिता मावळे, उमेश तुळसकर, सुभाष कुंटेवार, आशिष पर्बत आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
या बैठकीची सुरुवात भाजप नेते सुभाष कुंटेवार यांनी गायलेल्या स्फूर्ती गीताने झाली. या नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आमदार समीर कुणावार यांचे अभिनंदनाचा ठराव पारित करण्यात आला. अध्यक्षीय भाषणात आमदार समीर कुणावार म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंगणघाट विधानसभा मतदारसंघाच्या विकासाकरीता कोट्यावधीचा निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागातील रस्त्यांचा मोठ्या प्रमाणात विकास झाला. महाराष्ट्रात अनेक मराठा मुख्यमंत्री झाले . परंतु ते मराठ्यांना आरक्षण देऊ शकले नाही. अखेर देवेंद्र फडणवीसानी ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण वर तोडगा काढला. ग्रामीण भागातील पांदण रस्त्याबाबत शासनाने समिती तयार केली आहे. आणि या पांदण रस्त्याचे समितीवर माझी नियुक्ती झाली,अशी माहिती देऊन आ.कुणावार यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.
महाराष्ट्र शासनाने सेवा पांधरवाड्याअंतर्गत विविध कार्यक्रम व उपक्रम जाहीर केले आहेत. भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ते यशस्वीरीत्या राबवून तळागाळातील व्यक्तींना याचा लाभ मिळवून द्यावा असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.
विरोधकांचे वतीने मतचोरी अपप्रचार प्रचार सुरू आहे,यापासून सावध राहण्याची गरज आहे. येत्या काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीकरिता कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे. जनतेमध्ये जाऊन शासकीय योजनांची माहिती देऊन प्रत्येक मतदारांशी संपर्क साधावा असेही आवाहन त्यांनी केले.
अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती व इतर नुकसानीचे पंचनामे सुरू झाले असून शासनाचे वतीने नुकसान भरपाई मिळणार असल्याची माहिती दिली. यावेळी प्रा. डॉ.राजू निखाडे यांचेसह अनेकांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
सदर कार्यक्रमा दरम्यान भारतीय जनता पार्टी ,युवा मोर्चा, महिला मोर्चा, ओबीसी मोर्चा, भाजपा किसान आघाडी तसेच अल्पसंख्यांक मोर्चा हिंगणघाट शहर व हिंगणघाट तालुक्यातील कार्यकारीणी नियुक्ती घोषित करून नियुक्तीपत्रे वितरित करण्यात आली. याप्रसंगी प्रास्ताविक आकाश पोहाणे तर संचालन संजय माडे यांनी केले. उपस्थितांचे आभार भूषण पिसे यांनी मानले. उपरोक्त कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टी, भारतीय जनता युवा मोर्चा ,महिला मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्त्याची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

