✒️मंगेश जगताप, मुंबई प्रतिनिधी
मुंबई:- येथून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. पोलिसांनी मुंबई आणि गुजरातमधून तब्बल 317 कोटींच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. या प्रकरणी मुंबई आणि गुजरातमध्ये सहा जणांना अटक करण्यात आले आहे. या प्रकरणी मुंबईतून मुख्य आरोपी विकास जैन याला अटक करण्यात आली आहे.
बनावटी नोटा प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या विकास जैन याचा देशातील अनेक शहरात कुरियर फर्मचा व्यवसाय होता. याचा या कुरियर फर्मच्या माध्यमातून विकास जैन बनावट नोटांचं रॅकेट चालवत होता. मुंबई, आणंद, सूरत आणि जामनगर या चार शहरात विकास जैन मोठ्या प्रमाणात बनावट नोटांचं रॅकेट चालवत होता.
पोलिसांन कडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी विकास जैन या चार शहरातून देशभऱ्यातील अनेक शहरात बनावट नोटा पाठवत होता. गुजरात पोलिसांना याचा सुगावा लागल्यानंतर त्यांनी तात्काळ कारवाई केली. त्यांनी मुंबईतून विकास जैन याला बेड्या ठोकल्या तर अन्य पाच आरोपींना पाच शहरातून अटक केली.
अटक करण्यात आलेल्यामधील एक आरोपी सूरतमधील ग्रामीण भागामध्ये रुग्णवाहिका चालवण्याचं काम करत होता. त्याचं नाव हितेश कोटाडिया असे आहे. त्याच्याकडून 26 कोटींच्या जवळपास बनावट नोटा जप्त केल्या. पोलिसांनी जप्त केलेल्या बनावट नोटामध्ये दोन हजार आणि 500 रुपयांच्या नोटांचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2017 मध्ये नोटाबंदी जाहीर केली होती. 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या होत्या. तर 500 आणि दोन हजार रुपयांच्या नव्या नोटा चलनात आणल्या होत्या. पोलिसांनी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. विकास जैन याच्यासह सहा जणांविरोधात पोलिसांनी कलम 489 (A)(B)(C) , 406, 420, 201 आणि 120 (B) नुसार गुन्हा दाखल केलाय.

