सौ. हनिशा दुधे, तालुका प्रतिनिधी बल्लारपूर 9763268694
बल्लारपूर:- दि.५ ऑक्टोंबर ला गोरक्षण वॉर्ड येथे ६६वा धम्मचक्र परिवर्तन दीन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वात प्रथम महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्य अर्पण करून आणि दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाची सूरवात करण्यात आली.
या कार्यक्रमाला लाभलेले अध्यक्ष अमित माहोरे सर यांच्या हस्ते ध्वजारोहणचा कार्यक्रम करण्यात आला. तथागत भगवान बुद्धना माल्यार्पण सौ. दिपीका माहोरे यांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेला दीपप्रजोलन सागोरे जी यांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक सो.सारिका ताई दुर्योधन यांनी केले मार्गदर्शक म्हणून खोब्रागडे साहेब आणि उमरे ताई यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन कु.तनक दुर्योधन यांनी केलं तसेच आभार प्रदर्शन कू. पायल तावाडे यांनी केलं.
या कार्यकर्माचे आयोजन सौ. वनिता ताईरायपुरे यांनी केले कार्यक्रमात रामदास दुर्योधन जी आणि सौ.सारिका दुर्योधन यांचे स्वागत करण्यात आले. सौ वनिताताई रायपुरे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले आणि बरेच लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

