संतोष मेश्राम चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या राजुरा शाखेची निवडणूक १२ ऑक्टोबर रोजी झालेली असून, अध्यक्षपदी प्रा. अनंत डोंगे यांची निवड करण्यात आली असून सचिवपदी संतोष मेश्राम यांची निवड झाली आहे. ही निवडणूक लोकशाही पद्धतीने खेळीमेळीच्या सकारात्मक आणि आनंददायी वातावरणात पार पडली.
निवडणुकीसाठी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबईचे राज्य उपाध्यक्ष प्रा. महेश पानसे यांच्या सूचनेनुसार चंद्रपूर जिल्हाध्यक्ष शंकर बोरघरे यांच्या मार्गदर्शनात ही प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली.
निवडणूक अधिकारी म्हणून डिजिटल मिडियाचे जिल्हाध्यक्ष ॲड. राहुल थोरात यांनी अध्यक्षतेखाली निवडणूक घेण्यात आली. अध्यक्ष पदासाठी चार उमेदवारांमध्ये प्रा. अनंत डोंगे यांनी सर्वाधिक निर्णायक मते मिळवून विजय मिळवला. निवडणूक अधिकारी ॲड. राहुल थोरात यांनी याची अधिकृत घोषणा केली. राजुरा शाखेतील सर्व सदस्यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष प्रा. अनंत डोंगे यांचे अभिनंदन केले.
याचबरोबर, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष शंकर बोरघरे यांनी देखील प्रा. अनंत डोंगे यांच्या निवडीवर आनंद व्यक्त करून त्यांना आगामी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. प्रा. अनंत डोंगे यांनी सर्व उपस्थितांचे मनापासून आभार मानून संघाच्या कार्यासाठी पुढे काम करण्यासाठी उत्साह व्यक्त केला. या निवडणुकीने मराठी पत्रकार संघाच्या कार्यावर सकारात्मक ऊर्जा प्राप्त झाली असून, संघाच्या राजुरा शाखेच्या पुढील वाटचालीस एका नव्या उंचीवर नेण्याचा आत्मविश्वास सर्व सदस्यांत निर्माण झाला आहे.

