रविंद्र भदर्गे, जालना जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन परतूर:- दिनांक 07 डिसेंबर 2025 रविवार रोजी न्यू वंडर किड्स इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज चे स्नेहसंमेलन गजानन लान्स येथे मोठ्या उत्साहात पार पडले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर रेंगे साहेब यांनी व संस्था अध्यक्ष नारायण दादा सोळंके यांनी माता सरस्वती आणि राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाचे उद्घाटन केले.
यावेळी बोलतांना उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर रेंगे म्हणाले कि, मुलांच्या अंगभूत कलागुणांना वाव मिळण्यासाठी प्रत्येक शाळेने या पद्धतीचे भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित केले पाहिजे, अशा कार्यक्रमातून मुलांच्या सर्वांगीण विकासाला गती मिळते. त्याच शिक्षकांनी व पालकांनी मुलांच्या मनात मैदानी खेळाबद्दल आवड निर्माण करून त्याचे महत्त्व त्यांना पटवून द्यावे जेणे करून त्यांचा शारिरिक विकास होईल. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रिन्सिपल गोविंद पाठक यांनी केले तर सूत्रसंचालन संतोष हरकळ व नववी व दहावीचे विद्यार्थ्यां संस्कार भुतेकर, शौर्य देशमुख, प्रांजल शेरे, कार्तिकी शेरे, संस्कृती खरात, संस्कृती झरेकर, जान्हवी जगताप यांनी केले.
यावेळी संस्थाध्यक्ष नारायणदादा सोळंके, कार्याध्यक्ष गणेश सोळंके, उपाध्यक्ष रंगनाथ भुतेकर, सचिव छाया बागल, प्रमुख पाहुणे संतोष झरेकर, निवृत्ती बिडवे, ॲड प्रवीण चव्हाण, विष्णू ढवळे, मनोहर खालापुरे, सुरेश मोठे, बालासाहेब हरबक, सुभाष बागल, श्रीकांत बागल, वशिष्ठ सोळंके, प्रिन्सिपल गोविंद पाठक, वाईस प्रिन्सिपल पुजा मोरे, संतोषी कारके, महादेव कदम, दिनेश साठे, गोपीनाथ जगदाळे, रोहित जैस्वाल, ऐहतेशाम खान, अभिषेक आरसाड, सुलेमान सय्यद, किशोरी जोशी, दामिनी टाकणखार, राधिका चव्हाण, शारदा चव्हाण, मंगल वेडेकर, शालू पारखे, ज्योतिका जगताप, गीता पायघन, तसेच सेविका ज्योती निलेवाड, पार्वती गुंजमूर्ती आणि सुखदेव सस्ते उपस्थित होते.

