बैठकीत युनियन बँक ऑफ इंडिया शाखा अंकली तालुका मिरज जिल्हा सांगली चे शाखाधिकारी हेमंतकुमार शिंदे यांचा मनमानी व बेकायदेशीर कारभार उघड, संघर्ष आता मुंबईत निर्णायक टप्प्यावर!
उषाताई कांबळे सांगली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- युनियन बँक ऑफ इंडिया, शाखा – अंकली येथील अनुसूचित जातीतील पिडित कर्मचारी ऋषिकेश राजू कांबळे यांना शाखाधिकारी हेमंतकुमार शिंदे यांनी आपल्या मनमानी, हुकूमशाही व बेकायदेशीर कारभार पद्धतीने सेवेतून कमी केले, हे सदर बैठकीदरम्यान स्पष्टपणे सिद्ध (स्पष्ट) झाले आहे. हा प्रकार म्हणजे कामगार कायदे, भारतीय संविधान व मानवी हक्क यांची उघडपणे पायमल्ली असून युनियन बँक प्रशासनाच्या अन्यायकारक भूमिकेचे ठळक व उत्तम उदाहरण आहे.
या अन्यायाविरोधात वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन, सांगली जिल्हा यांच्या वतीने दि. 26 नोव्हेंबर – भारतीय संविधान दिनापासून लोकशाही मार्गाने बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले. मात्र युनियन बँक ऑफ इंडिया मॅनेजमेंटने या आंदोलनाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत शाखाधिकारी शिंदे यांच्या मनमानी कारभाराला अप्रत्यक्ष पाठबळ दिल्याचे चित्र दिसून आले.
बँक प्रशासनाच्या या निर्दयी व असंवेदनशील भूमिकेमुळे अखेर पिडित कर्मचारी ऋषिकेश कांबळे यांनी दि. 10 डिसेंबर जागतिक मानवी हक्क दिनापासून आमरण उपोषण सुरू केले. कडाक्याच्या थंडीतही सलग सहा दिवस उपोषण करावे लागणे, ही बाब बँक प्रशासनाच्या कामगारविरोधी मानसिकतेचे द्योतक आहे.
पिडित कर्मचारी यांच्या प्रकृतीला गंभीर धोका निर्माण झाल्याने, आमरण उपोषणाच्या सहाव्या दिवशी सांगली ग्रामीण पोलीस निरीक्षक श्री. वैभव तळेकर यांनी आपल्या दालनात मार्ग काढण्यासाठी बैठक बोलावली. या बैठकीस युनियन बँक ऑफ इंडिया कोल्हापूर रिजनल ऑफिसचे (एच.आर. हेड)– शालन काने, (डेप्युटी रिजनल हेड) गुरुप्रीत सिंग, तसेच अंकली शाखेचे शाखाधिकारी हेमंतकुमार शिंदे, बँकेचे तर्फे कायदेशीर सल्लागार पॅनल ॲड. लक्ष्मण दिंडोरे उपस्थित होते.
या बैठकीदरम्यान पिडित कर्मचारी ऋषिकेश कांबळे यांना कोणतीही कायदेशीर प्रक्रिया न पाळता, नोटीस न देता व कामगार कायद्याचे उल्लंघन करून सेवेतून कमी करण्यात आले असल्याचे ठोस पुरावे, कागदपत्रे व कायदेशीर मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट झाले. म्हणजेच, शाखाधिकारी हेमंतकुमार शिंदे यांनी मनमानी पद्धतीने बेकायदेशीर सेवा समाप्ती केली, हे बैठकीत स्पष्ट झाले.
पिडित कर्मचारी यांच्या समर्थनार्थ वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनचे पश्चिम महाराष्ट्र महासचिव प्रशांत वाघमारे,सांगली जिल्हा संपर्कप्रमुख संजय भूपाल कांबळे, जिल्हाध्यक्ष संजय संपत कांबळे, कार्याध्यक्ष जगदीश कांबळे, यांच्यासह कायदेशीर सल्लागार ॲड. संदिप मुतालिक, ॲड. सदानंद नागावकर, ॲड. महादेव मनापगोळ, ॲड. अमोल धेंडे, ॲड. संतोषकुमार सुवासे, ॲड. महेश पवार या वकिलांनी बँक प्रशासनास सणसणीत कायदेशीर मुद्द्यांवर जाब विचारला. कायदेशीर सल्लागार ॲड. संदिप मुतालिक यांच्या नेतृत्वाखाली अनेक अनुभवी वकील उपस्थित राहून बँक प्रशासनास कायदेशीर मुद्द्यांवर चोख प्रत्युत्तर दिले. पिडित कर्मचारी ऋषिकेश राजू कांबळे यांच्या समर्थनार्थ न्याय हक्कासाठी वकीलांची फौज सरसावली.
या तीव्र दबावामुळे व कायदेशीर वास्तव समोर आल्यानंतर युनियन बँक ऑफ इंडिया मॅनेजमेंटने पिडित कर्मचारी ऋषिकेश कांबळे यांना किमान वेतन, बोनस व थकित वेतन तात्काळ देण्याचे कबूल केले. त्यानंतर पोलीस निरीक्षक वैभव तळेकर, बँक प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या हस्ते लेखी पत्र देऊन व नारळपाणी पाजून आमरण उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले.
या वेळी उपस्थित मान्यवरांमध्ये वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष महावीर कांबळे, सामाजिक कार्यकर्ते उत्तम कांबळे, आंतरराष्ट्रीय मानवी हक्क संघटनेचे मिरज तालुका अध्यक्ष वसंत खांडेकर, सागर आठवले, कुमार भंडारे, संजय शिंदे, वंचित बहुजन आघाडी सांगली जिल्हा अनिल सावंत, दिपक कांबळे, मोहन साबळे, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष पवन वाघमारे, भारतीय बौद्ध महासभेचे जितेंद्र कोलप, अंकली गावातील सामाजिक कार्यकर्ते प्रदीप कांबळे, शशिकुमार कोलप, प्रल्हाद कांबळे, प्रदीप कोलप, तसेच अक्षय वाघमारे, मिरज सुधार समितीचे अध्यक्ष रूपेश तांबगावे, सांगली ग्रामीण गोपनीय शाखेचे पोलिस लक्ष्मण जाधव, अप्पा कोळी, आकाश ऐवळे, अमित पाटील, धीरज यादव, मंगेश कोळी, बनसोडे साहेब, घोलप साहेब आदी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
घेण्यात आली ठाम भूमिका : सध्या कडाक्याच्या थंडीमुळे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले असले तरी हा लढा संपलेला नाही. सदचे आंदोलन थांबलेले नाही फक्त पुढील निर्णायक टप्प्यासाठी सज्ज झाले आहे.
पिडित कर्मचारी ऋषिकेश राजू कांबळे यांना तात्काळ कायम सेवेत समाविष्ट करावे व शाखाधिकारी हेमंतकुमार शिंदे यांच्या बेकायदेशीर कारभाराची चौकशी करावी, या मूलभूत मागण्यांसाठी आता युनियन बँक ऑफ इंडिया – सेंट्रल ऑफिस, मुंबई यांच्या आवारात लोकशाही मार्गाने तीव्र व निर्णायक आंदोलन छेडण्यात येणार आहे.
कामगारांवर अन्याय करणाऱ्या बँक प्रशासनाला झुकविल्याशिवाय आणि पिडित कर्मचारी यांना संपूर्ण न्याय, सन्मान व कायम नोकरी मिळेपर्यंत हा संघर्ष थांबणार नाही – हा ठाम इशारा युनियन चे वतीने दिला गेला आहे!

