मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- सध्या हिंगणघाट शहरात मोठ्या प्रमाणात अवैध धंद्याला ऊत आला आहे. त्यामुळे पोलिस प्रशासन आहे की नाही असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वतःचे रक्षण स्वतःच करावे आणि भगवान भरोसे रहावे? अशा प्रश्न उपस्थित होत आहे. हे सर्व हिंगणघाट पोलिस स्टेशनचे माजी ठाणेदार देवेंद्र ठाकूर यांची देण असल्याची चर्चा रंगली आहे.
मागील 1 वर्षापासून हिंगणघाट पोलिस स्टेशनच्या हद्दीत मोठ्या चोऱ्या, खून, अवैध गावठी मोहा देशी दारू, अमली पदार्थांची त्यात गांजा, चरस, एमडी ड्रॅग, सुगंधित तंबाखूची विक्री, वाळू तस्करी सारख्या अवैध धंदे मोठ्या प्रमाणात वाढले आहे. तत्कालीन पोलिस निरीक्षक ठाकूर यांनी तर हद्दच पार करत अवैध धंदे वाल्यांना पोलिसाश्रय देत अवैध धंदे करायला मोकळे सोडले आणि कुणी यांच्या विरोधात गेली तर “सैतान सोडून संन्याशाला फाशी” यातून तत्कालीन ठाणेदार देवेंद्र ठाकूर याने अनेक निर्दोष नागरिकांवर खोटे गुन्हे दाखल केले. त्यात अल्पवयीन शालेय शिक्षण घेणारेही मूल यांनी सोडले नाही.
ठाकूर यांनी मोठी माया जमवली: तत्कालीन पोलिस ठाणेदार देवेंद्र ठाकूर यांनी आपल्या कार्यकाळात अनेक बेकायदेशीर मार्गाने प्रचंड संपत्ती जमवली. दरमहा लाखो रुपयांची हप्ताखोरीची चर्चा सर्वसामान्य आणि अवैध धंदे वाल्यांकडून चर्चेत होती. त्यामुळेच त्यांनी खुलेआम अवैध धंदे वाल्यांना मूक परवानगी दिली होती
यामुळेच ठाकूर यांची झाली बदली: तत्कालीन पोलिस निरीक्षक ठाकूर यांनी गुन्हेगार प्रार्श्वभूमीच्या लोकांना पोलिसाश्रय दिला. त्यामुळे यांचे धाडस इतके वाढले की, यांच्या कार्यकाळात गुन्हेगाराने मिळून भरचौकात पोलिसांवर धारधार शस्त्राने वार करत हल्ला केला होता. त्यात हिंगणघाट शहरातील विठोबा चौकात चक्क आर्मीमॅन ने पोलिस ठाणेदार देवेंद्र ठाकूर यांना शर्टची कॉलर पकडून मारहाण केली होती. या सर्व घटनामुळे पोलिस अधीक्षक अनुराग जैन यांनी त्यांची तडकडकी बदली केली.

