मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट :- श्री साई प्रतिष्ठान, नंदोरी रोड हिंगणघाट द्वारा आयोजित श्री. संत साईबाबा मूर्ती प्राण प्रतिष्ठापना दिन व प.पु.श्री. संत लक्ष्मीमाताजी पुण्यतिथी महोत्सव निमित्य १८ डिसेंबरपासून दुपारी ०२ ते ०६ वाजेपर्यंत श्री साई कथा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
श्री साई कथाकार भागवताचार्य, झी टी व्ही फेम, ह.भ.प. बाळकृष्ण महाराज सुरासे (शिर्डी) यांच्या ओजस्वी वाणीतून श्रोत्यांना श्री साई कथेचे कथेचे महत्व सांगणार आहे.
२३ डिसेंबर रोज मंगळवारला निशुल्क आरोग्य तपासणी व औषधोपचार महाशिबीराचे आयोजन करण्यात आले असून २४ डिसेंबर ला भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. हिंगणघाट क्षेत्रातील सर्व भाविकांनी कथाकार ह.भ.प. बाळकृष्ण महाराज सुरासे (शिर्डी) यांच्या ओजस्वी वाणीतून श्री साई कथेचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री. साई प्रतिष्ठानचे अध्यक्ष योगेश्वर महाराज, सचिव अतुल वांदिले यांनी केले आहे.

