मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
अहेरी :
अहेरी तालुक्यात शिक्षण विभाग व पंचायत समिती, अहेरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सन 2025–2026 चे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन मोठ्या उत्साहात व जल्लोषात पार पडले. या प्रदर्शनात तालुक्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नाविन्यपूर्ण, संशोधनात्मक व समाजोपयोगी विज्ञान प्रकल्पांनी उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले.
या विज्ञान प्रदर्शनाचा भव्य बक्षीस वितरण समारंभ रविवार, दि. 21 डिसेंबर 2025 रोजी भगवंतराव हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय, अहेरी येथे संपन्न झाला. यावेळी गुणवंत व प्रकल्प सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्रे प्रदान करून गौरविण्यात आले.
कार्यक्रमास मा. श्री. प्रतीक आढाव (नायब तहसीलदार, अहेरी) व मा. डॉ. लुबना हकीम (वैद्यकीय अधिकारी, महागाव) हे प्रमुख बक्षीस वितरक म्हणून उपस्थित होते, तर मान. श्री. गणेश चव्हाण (गटविकास अधिकारी, अहेरी) यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषविले.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून
मा. श्री. गौतम साडवे
(पोलीस उपनिरीक्षक, प्राणहिता अहेरी),
मा. श्री. सुनील आईंचवार
(खंड शिक्षण अधिकारी, अहेरी)
मा. श्री. शैलेश पाटील
(उपनगराध्यक्ष, नगर पंचायत अहेरी),
श्री. शाहीद शेख सर
(प्राचार्य भगवंतराव हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय, अहेरी)
मा. श्री. राहुड सर
(स्पेशल शिक्षक, BRC अहेरी),
श्री. गुंड सर
(केंद्रप्रमुख, देवलमरी),
श्री. उमेश चिल्लेलवार
(केंद्रप्रमुख, अहेरी),
श्री. प्रवीण पुल्लूरवार (केंद्रप्रमुख, राजाराम खांडला)
यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे, संशोधनाची आवड निर्माण करणे तसेच नवकल्पनांना प्रोत्साहन देणे या उद्देशाने या विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. हा उपक्रम यशस्वी केल्याबद्दल आयोजक, शिक्षक व शाळा व्यवस्थापनाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.
भगवंतरावहायस्कूल
#अहेरी
#तालुकास्तरीयविज्ञानप्रदर्शन
#ScienceExhibition2025
#PrizeDistribution
#विद्यार्थ्यांचीयश
#ScientificThinking
#FutureScientists
#InnovationInEducation
#EducationDepartment
#PanchayatSamitiAheri
#QualityEducation
#StudentInnovation
#AheriNews
#GadchiroliDistrict

