मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- नगर परिषद निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि आरपीआय आठवले युतीला चांगले यश मिळताना बघायला मिळत आहे. हिंगणघाट नगर पालिका निवडणुकीमध्ये भाजपा नगराध्यक्षपदाच्या उमेदवार डॉ. नयना उमेश तुळसकर विजयी झाले आहेत. त्यात हिंगणघाट नगर पालिकाचे 3 माजी नगराध्यक्ष याच्या पराजय झाला आहे.
माजी नगराध्यक्ष सुरेश मुजेवार यांनी प्रभाग क्रमांक 17 मधून नगर सेवक पदाची राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून निवडणूक लढवली होती पण भाजपा उमेदवार अतुल नंदागवळी यांनी त्यांचा पराभव केला. त्यामुळे मुजेवार यांना नगर पालिका निवडणुकीत जोरदार धक्का बसला आहे.
माजी नगराध्यक्ष चंद्रकांत घुसे यांनी प्रभाग क्रमांक 02 मधून नगरसेवक पदाची राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून निवडणूक लढवली होती पण भाजपा उमेदवार वामन मावळे यांनी त्यांचा पराभव केला. त्यात चंद्रकांत घुसे यांच्या पत्नी योगिता घुसे यांनी पण नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवली होती त्याचपण मोठ्या मतधीक्याने पराभव झाला आहे. त्यामुळे चंद्रकांत घुसे यांना नगर पालिका निवडणुकीत डबल धक्का बसला आहे.
माजी नगराध्यक्ष पंढरी कापसे यांनी प्रभाग क्रमांक 03 मधून नगरसेवक पदाची राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवली होती पण भाजपा उमेदवार कमलेश उर्फ बंटी वाघमारे यांनी त्यांचा पराभव केला. त्यामुळे पांढरी कापसे यांना नगर पालिका निवडणुकीत जोरदार धक्का बसला आहे.
हिंगणघाट नगर पालिका निवडणुकीत भाजपा महायुतीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार डॉ. नयना उमेश तुळसकर विजयी झाले आहेत. भारतीय जनता पक्षाला 40 पैकी 29 जागा मिळाल्या आहेत.

