राज शिर्के मुंबई महानगर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:– उपनगर दिवा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे घराबाहेर खेळत असताना एका 5 वर्षीय चिमुकलीला कुत्रा चावल्याने महिनाभर सुरू असलेली मृत्यूशी झुंज अखेर संपली. निशा शिंदे वय 5 वर्षे) या चिमुकलीच नाव असून रविवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेनं संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
नेमकी काय आहे ही घटना: दिवा पूर्वेकडील बेडेकर नगर दिवा- आगासन रोड परिसरातील घरासमोर निशा शिंदे ही 5 वर्षीय चिमुकली 17 नोव्हेंबर रोजी खेळत होती. खेळता-खेळता ती कठड्यावर बसली असताना तिला खांद्याचा पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतला. या चिमुकलीला रक्तबंबाळ अवस्थेत पालकांनी तातडीने कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तिला रेबीजचे इंजेक्शन दिले. तिच्या इंजेक्शनचा चौथा डोस 17 डिसेंबर रोजी देण्यासाठी तिला रुग्णालयात नेण्यात आले.
वाढदिवसानंतर या चिमुकलीचा तब्येत खालावली 3 डिसेंबरला निशाचा वाढदिवस साजरा करण्यात आला, तेव्हा तिची प्रकृती स्थिर होती. मात्र, 16 डिसेंबरला उपचाराचे शेवटचं इंजेक्शन दिल्यानंतर तिची प्रकृती अचानक खालावली. तिच्यात रेबीजचे लक्षणं दिसू लागले. ती स्वत:च्याच शरीराचे चावे घेऊ लागल्याने डॉक्टरांनी तिला तातडीने कस्तुरबा रुग्णालयात पाठवले.
चार दिवस निशावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, दिवसागणिक तिची प्रकती आणखीनच खालावत गेली. चिमुकलीची अशी अवस्था बघून कुटुंबियावर दु:खाचा डोंगरच कोसळला. आणि २१ डिसेंबर रोजी निशाचा करूण अंत झाला. तिच्या मृत्यूमुळे दिवा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. वेळेत उपचार न मिळाल्याने आपल्या भाचीचा मृत्यू झाल्याचा आरोप निशाचा मामा समाधान कदम याने केला आहे.

