अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर:- १७ डिसेंबरला गुरुग्राम (दिल्ली) येथे एस चांद पब्लिकेशन तर्फे आयोजित The Quest to Crown India’s Ultimate Quiz CHAMPION ग्रँड फिनाले ह्या स्पर्धेमध्ये सदर शाळेच्या वर्ग 8 वीचे विद्यार्थी संकेत गेडाम व यश चंदनबटवे यांनी नागपूर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना भारतभरातून येणाऱ्या 10 शाळांमधून 5 वा क्रमांक मिळविला.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. श्री अशोक जिवतोडे, संस्थेच्या सचिव डॉ. सौ. प्रतिभा जिवतोडे, उपाध्यक्ष अंबर जिवतोडे, संचालक रत्नाकरजी डहाके (पाटील), तसेच शाळेच्या प्राचार्या सौ. ममता अग्रवाल (CBSE Board), सौ. वैशाली देशपांडे, क्रीडा शिक्षक चंद्रकांत कोमुजवार, अमोल जीवतोडे, प्रफुल नारनवरे, दिनेश निखाडे व शाळेतील सर्व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

