प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- हिंगणघाट व सिंदी (रेल्वे) येथील नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विजयी सात उमेदवाराचा सत्कार सोहळा हिंगणघाट येथील पक्ष कार्यालयात पार पडला. सदर कार्यक्रमाला वर्धा जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले, विदर्भ विकास आघाडीचे नेते अनिल जवादे, जेष्ठ नेते सुनिल राउत, शुभांगी डोंगरे, उपस्थित होते.
हिंगणघाट नगरपरिषदेतील विजयी उमेदवार सौं. शितल अमोल बोरकर, सौं.मनिषा प्रशांत लोणकर, सिंदी रेल्वे येथील विजयी उमेदवार आशिष देवतळे, तुषार हिंगणेकर, सौं.ज्योत्ना तडस, सौं. वर्षा बोबले, जगदीश बोरकर यांचा शाल, श्रीफल व वृक्ष देवून सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, माजी नगरसेवक अशोक पराते, शहराध्यक्ष बालू वानखेडे, सुनिल डोंगरे, मोहम्मद रफिक यांच्यासह शहरातील पक्षाचे नगरसेवक उमेदवार, सर्व प्रमुख पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

