प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरात मागील एक महिन्यांपासून सार्वजनिक मंदीरातील घंटा, दानपेटी आणि मालवाहू गाडीच्या बॅटऱ्या तसेच पाण्याचे मोटार, काटेरी तार बंडल चोरणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात येथील गुन्हे प्रगटीकरण पथकाला यश आले असून, त्यांच्याकडून ३३ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी शेख सकलेन शेख जाकीर वय २० वर्ष रा. हनुमान वॉर्ड हिंगणघाट, मंथन गणेश जुमडे वय १९ वर्ष रा. डांगरी वॉर्ड हिंगणघाट व विधीसंघर्षीत बालक यांना अटक केली आहे.
हिंगणघाट पोलीस ठाण्यात भवानी माता मंदीर, सेंट्रल वॉर्ड येथील दानेपटी व घंटी तसेच इतर ठिकाणांवरून मालवाहू वाहनाच्या बॅटऱ्या, पाण्याच्या मोटारी, काटेरी तारबंडल चोरी अशा
विविध तक्रारी प्राप्त झाल्या. या संदर्भात
गुन्हे प्रगटीकरण पथकप्रमुख प्रवीण बावणे
यांच्या पथकाने तपास सुरू केला. यात शेख सकलेन शेख जाकीर, मंथन गणेश जुमडे
व विधीसंघर्षीत बालक यांना ताब्यात घेऊन तपास केला असता त्यांनी भवानी माता मंदीरातील दानपेटी व घंटी चोरुन नेल्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून स्टिलची दानपेटी किंमत १५ हजार, पितळी घंटी किंमत ५०० रुपये, दानपेटीतील चोरीस गेलेले ५ हजार जप्त करण्यात आले.
तसेच हिंगणघाट शहरात वेगवेगळ्या मंदिरात चोरी केलेल्या सात घंट्या ३५०० रुपये, एक तार बंडल किंमत १ हजार, बॅटरी किंमत ६ हजार, पाण्याची मोटार व चोरीकरिता वापरलेले साहित्य २ हजार
असा एकुण मालमत्ता ३३ हजारांचा माल जप्त केला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अनुराग जैन, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार अनिल राऊत, संगीता हेलोंडे, प्रवीण बावणे, नरेंद्र आरेकर, निलेशसिंग सूर्यवंशी, संतोष गिते, सागर सांगोले यांनी केली.

