नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन वनपरीक्षेत्र अधिकारी गौरेश गडमडे यांनी केली आहे.
मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
सिरोंचा वन उपविभागीय अंतर्गत येत असलेल्या कमलापूर वनपरीक्षेत्र हद्दीतील कोडसेपल्ली उपक्षेत्रा अंतर्गत नियमतक्षेत्र कोडसेपल्ली 1 मधील खंड क्र. 104 मध्ये आज सकाळी गाय चराई साठी जंगलात गेले असता हिंस्त्र वन्यप्राण्याने एका शेतकऱ्यांचा गाईला ठार करण्यात आले आहे. विनोद डोलू तलांडी यांची गाय असून चौकशी करून नुकसान भरपाई देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. त्यावरुन वनअधिकाऱ्यां मार्फत सदर घटनेचा पंचनामा करुन नुकसान भरपाईची रक्कम लवकरात लवकर अदा करण्यात येईल असे सांगीतले. तसेच या भागातील नागरिकांनीं सतर्क राहण्याचे आव्हान वनपरीक्षेत्र अधिकारी गडमडे यांनी पत्रकातून केली आहे.

