पोलीस प्रभारी अधिकारी हर्षल एकरे यांच्या नेतृत्वात कारवाई.
मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
अहेरी: आगामी मकर संक्रांती सणाच्या पार्श्वभूमीवर नायलॉन मांजाच्या विक्रीला प्रतिबंध करण्यासाठी पोलिस विभागाने कठोर कारवाई सुरू केली आहे.अहेरीचे पोलीस निरीक्षक हर्षल एकरे यांच्या नेतृत्वात आलापल्लीतील एका दुकानात धाड टाकून ३००० रुपयांचा नायलॉन मांजासह मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे .रोहीत राजू खांडरे (वय २१ वर्ष, रा. आलापल्ली) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
आलापल्ली शहरात आगामी मकरसंक्रांत निमित्ताने नायलॉन मांजा विक्री सुरू असल्याची गुप्त माहिती मिळताच पोलीस अधिक्षक निलोत्पल यांच्या आदेशानुसार आणि अजय कोकाटे, उपविभागीय पोलीस अधिकारी अहेरी यांच्या मार्गदर्शनाखाली अहेरी पोलिसांनी ८ जानेवारी रोजी आलापल्ली येथे रोहित राजू खांडरे यांच्या दुकानात छापा टाकून ही कारवाई केली.त्यामुळे परिसरात मांजा विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
ही कारवाई सपोनि मंगेश वळवी, पोउपनि दिनेश येवले, नापोशि/निलावार, नापोशि/महेश सडमेक आणि पोशि/विनोद आजम यांनी केली.
मकर संक्रांती सणानिमित्त पतंग उडविण्यासाठी नायलॉन मांजाचा वापर करू नये. हा मांजा पक्षी, प्राणी आणि मानवी जिवीतासाठी जीवघेण्या धोकादायक ठरतो, ज्यामुळे जिवीतहानी होण्याची शक्यता दाट नाकारता येत नाही . नायलॉन मांजाचा वापर टाळावा आणि सुरक्षित सण साजरा करावा,असे आवाहन अहेरीचे पोलीस निरीक्षक हर्षल एकरे केला आहे.

