Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

संगमनेर तालुक्‍यातील नामांकित मूकबधीर शाळेत अवघ्या सात वर्षाच्या मुलीच्या गुप्तांगावर दिसल्या भाजल्याच्या खुणा, जिल्हात एकच खळबळ.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
October 8, 2022
in क्राईम, देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
संगमनेर तालुक्‍यातील नामांकित मूकबधीर शाळेत अवघ्या सात वर्षाच्या मुलीच्या गुप्तांगावर दिसल्या भाजल्याच्या खुणा, जिल्हात एकच खळबळ.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

🖋️ महेंद्र कदम, संगमनेर तालुका प्रतिनिधी

संगमनेर – तालुक्‍यातील एका नामांकित मूकबधीर शाळेत अवघ्या सात वर्षाच्या मुलीच्या गुप्तांगावर भाजल्याच्या खुणा दिसून आल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे शाळेने सदर घटना लपून ठेवल्याने मुख्याध्यापक चांगदेव खेमनर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विद्यार्थीनीला नक्की काय झाले याबाबत संशय व्यक्त करण्यात येत आहे.

पीडित मुलीच्या पालकांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मुख्याध्यापक चांगदेव खेमनर रा.ओझर, ता. संगमनेर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुरी तालुक्‍यातील एका गरीब कुटुंबातील एक मूकबधिर मुलगी असल्याने तिला शाळा शिकविण्याचा निर्णय पालकांनी घेतला होता. जून 2022 मध्ये त्यांनी तिला संगमनेर तालुक्‍यातील संग्राम मूकबधिर शाळेत दाखल केले.

दरम्यान काही दिवसांपूर्वी मॅडमचा फोन आला की, तुमच्या मुलीला जरा एका ठिकाणी जखमा झाल्या आहेत. त्यामुळे ती फार रडत आहे. तुम्ही येऊन तिच्याशी बोला आणि तिला घेऊन जा. त्यानंतर पालकांनी तत्काळ शाळेत जाऊन मुलीची भेट घेतली. मात्र, या जखमा झाल्या कशा? याबाबत विचारणा केली असता त्यांच्याकडून सांगण्यात टाळाटाळ करण्यात आली. एका शिक्षिकेने तुमच्या मुलीच्या नाजूक भागाच्या आसपास जखमा झालेल्या असून, आम्ही तीन दिवसांपासून त्यावर उपचार करीत आहोत. मात्र, त्यात कोणताही फरक पडत नसल्याने तुम्हाला बोलावले आहे.

तुम्ही तिला घेवून जा व चांगल्या दवाखान्यात तिच्यावर उपचार करा’ असा सल्ला त्यांना दिला. त्यानुसार मुलीला सोबत घेवून आपले मूळगाव गाठले व त्याच दिवशी तिला नजीकच्या गावातील एका खासगी डॉक्‍टरांकडे दाखवून गोळ्या-औषधे घेतली. मात्र, त्यातूनही कोणताच फरक न पडल्याने त्यांनी सोमवारी तिला लोणीच्या ग्रामीण रुग्णालयात नेले.

त्याठिकाणी मुलीच्या तपासणीनंतर तिच्या नातेवाईकांनी तपासणी अहवालाबाबत डॉक्‍टरांकडे चौकशी केली असता त्यांनी सदर प्रकरणाचा अहवाल तुमच्याकडे देता येणार नाही, तुम्ही पोलीस ठाण्यात जावून तक्रार दाखल करा, त्यांच्या मागणीवरून तपासणीचा अहवाल त्यांनाच दिला जाईल, असे सांगितल्याने त्या चिमुरडीचे नातेवाईक हादरले.

त्यांना नेमकं काय झालंय हेच समजत नसल्याने मुलीच्या आई-वडिलांसह तिच्या मामाने तेथून थेट संगमनेरात येवून “ती’ शाळा गाठली शाळेच्या मुख्याध्यापकांची भेट घेत आमच्या मुलीला कोणत्या कारणाने जखमा झाल्या आहेत अशी विचारणा केली. त्यांनी तुम्ही नाहक प्रकरणं न वाढवता चर्चेतून मार्ग काढून ते मिटवून घेण्याची विनंती त्यांना केली. त्यानंतर ते सर्व शहर पोलिसांत जाऊन थेट अधिकाऱ्यांना झालेला प्रकार सांगितला असता त्यांना ग्रामीण रुग्णालयात तपासणीसाठी पाठवण्यात आले.

तेथून ते अहमदनगरच्या शासकीय रुग्णालयात दाखल झाल्यानंतर पालकांनी लोणीच्या ग्रामीण रुग्णालयाने दिलेल्या प्राथमिक तपासणी अहवालाच्या आधारावर संगमनेर पोलिसांनी पीडितेच्या मामाची फिर्याद दाखल करून घेतली आहे. या प्रकरणाची संगमनेर तालुक्‍यात खळबळ उडाली असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहे. पोलीस तपासात सत्य बाहेर पडणार असून, तोपर्यंत संगमनेरमधील वातावरण ढवळून निघणार आहे. पोलिसांनी या प्रकरणातील सत्य शोधून काढावे, अशी मागणी संस्थेने केली आहे.

सदर प्रकरणाची गंभीर दखल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली असून प्रशासनाला याबाबत सूचना केल्या आहेत. मुलीची अवस्था बिकट आहे. तिला चालताही येत नाही. त्यामुळे हा जो हलगर्जीपणा ज्याने केला आहे, त्याला कोणत्याही परिस्थितीत सोडण्यात येणार नाही. चालक- मालक हे स्वतः डॉक्‍टर असून त्यांच्या संस्थेत अशी घटना घडणे म्हणजे अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे. या अनुषंगाने राज्यातल्या जितक्‍या याप्रकरच्या शाळा आहेत त्यातील मुलींची तपासणी राज्य सरकारच्या मेडिकल टीमने करावी, अशी मागणी आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना करणार आहोत
चित्रा वाघ, भाजपा नेत्या.

घटनेचे राजकारण करणे विकृत पणाचे -शिंदे
मागील 32 वर्षांपासून अत्यंत सेवाभावीपणे दिव्यांग मुलांसाठी कार्यरत असलेली ही एकमेव शाळा असून दिव्यांग मुलीच्या आजारपणावरून आणि अपुऱ्या माहितीच्या आधारे राजकारण करणे अत्यंत विकृतपणाचे असल्याची टीका विश्‍वस्त सूर्यकांत शिंदे यांनी केली. आत्तापर्यंत कधीही अनुचित प्रकार घडलेला नाही. सर्व शिक्षक, महिला शिक्षक या दिव्यांग मुलांची विशेष काळजी घेत आहेत. महिला कर्मचाऱ्यांची संख्या ही येथे मोठी आहे. दोन महिला केअरटेकर आहेत. संस्थेच्या परिसरात सुसज्ज व अद्यावत अशी सीसीटीव्ही यंत्रणा आहे. कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी सर्व प्रकारची काळजी सातत्याने घेतली जात आहे. या प्रकरणाची निः पक्षपणे चौकशी व्हावी व दोषी असलेल्या व्यक्तींवर कठोरात कठोर कारवाई व्हावी, अशी आमची मागणी असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

Previous Post

मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय करवून घेणा-या स्पा चालक, मॅनेजरसह अटक करुन चार पिडीत परदेशी मुलींची केली सुटका

Next Post

हिंदूंनो, संवैधनिक दृष्टीने भारताला हिंदु राष्ट्र घोषित करण्यासाठी संघटित व्हा: चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ता, सनातन संस्था.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
हिंदूंनो, संवैधनिक दृष्टीने भारताला हिंदु राष्ट्र घोषित करण्यासाठी संघटित व्हा: चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ता, सनातन संस्था.

हिंदूंनो, संवैधनिक दृष्टीने भारताला हिंदु राष्ट्र घोषित करण्यासाठी संघटित व्हा: चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ता, सनातन संस्था.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In