Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

हिंदूंनो, संवैधनिक दृष्टीने भारताला हिंदु राष्ट्र घोषित करण्यासाठी संघटित व्हा: चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ता, सनातन संस्था.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
October 8, 2022
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
हिंदूंनो, संवैधनिक दृष्टीने भारताला हिंदु राष्ट्र घोषित करण्यासाठी संघटित व्हा: चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ता, सनातन संस्था.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

विश्वास वाडे, चोपडा तालुका प्रतिनिधी

चोपडा:- अनादी अनंत काळापासून भारत हिंदु राष्ट्र होता आणि आहे. स्वातंत्र्यपूर्व काळी भारतात ५६६ स्वतंत्र हिंदू राजसंस्थाने होती. वर्ष १९५० ला आपण संविधानाचा स्वीकार केला. १९७६ मध्ये तत्कालीन केंद्र सरकारने ४२ वी घटनादुरुस्ती करून समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे शब्द घुसडले. भारतात आजही हिंदूंचे शोषण करणारे कायदे अस्तित्वात आहेत. त्यांना सडक, संसद आणि सर्वोच्च न्यायालय या मार्गाने विरोध करण्याची आवश्यकता आहे. हिंदूंनो, भारताला संवैधानिक दृष्ट्या हिंदु राष्ट्र घोषित करण्यासाठी संघटित व्हा, असे आवाहन सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते चेतन राजहंस यांनी केले. ते चोपडा येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने संस्कार मंडपम सभागृहात ७ ऑक्टोबर या दिवशी आयोजित ‘हिंदूसंघटन मेळावा’ प्रसंगी बोलत होते.

या मेळाव्याला सनातनच्या सौ. क्षिप्रा जुवेकर आणि हिंदु जनजागृती समितीचे जळगाव जिल्हा समन्वयक प्रशांत जुवेकर यांनीदेखील संबोधित केले. वक्फ बोर्डच्या विरोधात सनदशीर मार्गाने लढा उभारणे काळाची आवश्यकता ! – प्रशांत जुवेकर, जळगाव जिल्हा समन्वयक, हिंदु जनजागृती समिती
भूमी बळकवणे, खडणी वसूल करणे’, धर्मांतरण करणे आदी षड्यंत्र राबवणाऱ्या वक्फ बोर्डच्या विरोधात हिंदूंनी संघटित होऊन सनदशीर मार्गाने लढा उभारणे ही काळाची आवश्यकता आहे. यासाठी जळगाव येथे याविरोधात समस्त हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने 20 ऑक्टोबरला भव्य आंदोलन उभारणार असून चोपडा येथे 10 ऑक्टोबर या दिवशी सकाळी 11 वाजता तहसील कचेरीत निवेदन देण्यात येणार असल्याची घोषणा समितीचे जळगाव जिल्हा समन्वयक प्रशांत जुवेकर यांनी केली. त्यास उपस्थितांनी अनुमोदन दिले.ते पुढे म्हणाले की या छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचे साक्षीदार असलेल्या या महराष्ट्रातील गड दुर्ग यांची वर्तमान स्थिती अत्यंत दयनीय आहे. अनेक गड दुर्गांवर धर्मांधांनी अतिक्रमण केले आहे आणि प्रशासन त्याकडे कानाडोळा करत आहे. आपल्या पूर्वजांचा हा वारसा पुढील पिढीकडे हस्तांतरित करण्यासाठी आता आपल्याला जोमाने प्रयत्न करावे लागतील. चोपडा येथील किल्ले चौगाव याकडेही वेळीच लक्ष देणे आवश्यक आहे अन्यथा भविष्यात तेथेही अतिक्रमण होऊ शकते.


लव्ह जिहाद पासून रक्षण होण्यासाठी धर्माचरण करणे महत्वाचे !- सौ. क्षिप्रा जुवेकर, सनातन संस्था हिंदुं बहुल देशात हिंदू स्त्रियांचे दर पत्रक तयार करून आज लक्षावधी हिंदू स्त्रियांना प्रेमाच्या जाळ्यात फसवण्यात आले आहे. त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करण्यात आले आहे. नकार देणाऱ्या युवतीच्या तर थेट हत्याच केल्या जात आहेत. या स्थितीत हिंदु महिलांनी या आघात विषयी जाणून घ्यायला हवे. हिंदु धर्माचे आचरण केल्यास त्यांच्या आत्मबल निर्माण होऊन त्या या आघतांचा सक्षमपणे सामना करू शकतील.हिंदु राष्ट्र स्थापनेच्या उद्देशाने मागील 20 वर्षे अविरतपणे कार्यरत असलेल्या हिंदु जनजागृती समितीच्या स्थापनेला 26 सप्टेंबर 2022 या दिवशी अर्थात् घटस्थापनेच्या दिनी 20 वर्षे पूर्ण झाली आहेत. या द्विदशक-पूर्तीनिमित्त संपूर्ण देशभरात समितीच्या वतीने व्यापक स्तरावर ‘हिंदु राष्ट्र संकल्प अभियान’ राबवले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्याला चोपडा येथील
शेकडोच्या संख्येने धर्मप्रेमी उपस्थित होते.
दीपप्रज्वलनाने मेळाव्यास प्रारंभ झाला. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या गेल्या 20 वर्षांतील कार्याचा परिचय आणि स्वसंरक्षक प्रात्यक्षिकांच्या ध्वनिचित्रफिती दाखवण्यात आल्या. सुत्रसंचलन निखिल कदम यांनी केले.

Previous Post

संगमनेर तालुक्‍यातील नामांकित मूकबधीर शाळेत अवघ्या सात वर्षाच्या मुलीच्या गुप्तांगावर दिसल्या भाजल्याच्या खुणा, जिल्हात एकच खळबळ.

Next Post

अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील संग्राम मूकबधिर वस्तीगृहात सात वर्षांच्या मुलीवर अत्याचार, पोलीस ठाण्यामध्ये पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील संग्राम मूकबधिर वस्तीगृहात सात वर्षांच्या मुलीवर अत्याचार, पोलीस ठाण्यामध्ये पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल.

अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील संग्राम मूकबधिर वस्तीगृहात सात वर्षांच्या मुलीवर अत्याचार, पोलीस ठाण्यामध्ये पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In