टिटोळा येथे भव्य कार्यकर्ता मेळावा उत्साहात संपन्न.
मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
*एटापल्ली:-* तालुक्यातील टिटोळा येथे भव्य कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अहेरी इस्टेट चे राजे तथा माजी राज्यमंत्री राजे अंब्रीशराव आत्राम होते.अध्यक्षीय भाषणात बोलतांना ते म्हणाले स्थानिक आमदारांच्या दुर्लक्षामुळे परिसरातील मूलभूत समस्या आजही प्रलंबित असून युवकांना रोजगार मिळालेला नाही.
पुढे बोलताना म्हणाले,परिसरात येणाऱ्या नवीन कंपनीने जनतेची दिशाभूल करून चुकीच्या पद्धतीने जनसुनावणी घेण्यात आली.यामुळे स्थानिक नागरिकांच्या हक्कांवर गदा येत असल्याचे त्यांनी सांगितले.
‘जल,जंगल आणि जमीन ही येथील जनतेची असून त्यावर बाहेरील कोणाचाही अधिकार होऊ देणार नाही असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले.कंपनीने विकासाच्या नावाखाली स्थानिकांच्या हक्कांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
युवकांना रोजगार,पीडित शेतकऱ्यांना न्याय आणि स्थानिक जनतेच्या हक्कांचे संरक्षण यासाठी लढा सुरूच राहील,असे आश्वासन राजे साहेबांनी दिले.तसेच यावेळी अनेक गावातील नागरिकांच्या विविध समस्या राजे साहेबांनी जाणून घेतल्या.
त्यावेळी आदिवासी आघाडी महामंत्री प्रशांत आत्राम,जिल्हा सचिव मोहन नामेवार, तालुका अध्यक्ष प्रसाद पुल्लूरवार,येमूला जेष्ठ कार्यकर्ते,माजी जिल्हा परिषद सदस्य चुन्दू दोरपट्टी,बाबुराव पुंगाटी,रामू गोटा,रामजी वेळदा,मगरू वेळदा,मधुकर नरोटे,प्रवीण आलाम,विनोद दोरपट्टी,सत्तू हिचामी,पासू नरोटे,सुरेश तलांडे तसेच परिसरातील कार्यकर्ते आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

