सौ. हनिशा दुधे चंद्रपूर उपजिल्हा मो 9764268694
राजुरा :_ मूळचे सावली तालुक्यात दबगाव येथील सेवानिवृत्त गटसचिव आयु. भीमराव खोब्रागडे हे चार- पाच वर्षापासून राजुरा येथे राहत आहेत. त्यांनी वयाच्या 75 व्या वर्षी लिहिलेल्या व शब्दांकित केलेल्या लेख व काव्य संग्रहरुपी ‘ हादरा ‘* या पुस्तकाचे प्रकाशन दिनांक 11/01/2026 रोज रविवारला सम्यक बुद्ध विहार, सोमनाथपूर वॉर्ड राजुरा येथे मारोतराव रायपुरे* केंद्रप्रमुख चंद्रपूर यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाला.या पुस्तकाचे प्रकाशन लेखक,कवी आद.किशोर तेलतुंबडे* जिल्हाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा, चंद्रपूर यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमात विशेष उपस्थितीमध्ये डॉ.जीशांत नंदेश्वर, रविंद्र खैरे,धर्मुजी नगराळे, पुरुषोत्तम वनकर,गौतम जुलमे,गौतम चौरे,गौतम देवगडे, विनोद निमसरकर,प्रभाकर लोखंडे, ऊत्तम रामटेके,पौर्णिमा ब्राम्हने इत्यादी उपस्थित होते. पुस्तक वाचल्याने ज्ञानात भर पडते. त्यामुळे समाजाचे जीवन अर्थपूर्ण व सुंदर बनते विद्यार्थी, युवकांनी आत्मविश्वास,ध्येय, चिकाटी, सातत्य, यश व प्रचंड मेहनत करावी असे कवी भीमराव खोब्रागडे यांनी प्रेरणागीत गाऊन आपल्या मनोगतात व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विरेनकुमार खोब्रागडे* तर सुंदर सूत्रसंचालन कालुराम चहांदे* व आभार प्रदर्शन कु. ओजस खोब्रागडे* यांनी केले
या कार्यक्रमाला राजुरा तालुक्यातील जनतेनी उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी केला.
