नागपूर शहर प्रतिनिधी
नागपूर:- युवा चेतना मंच हिंगणा नागपुर या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष तसेच महाराष्ट्र गौरव पुरस्कृत जगदिश भाऊ वानोडे यांच्या प्रमुख उपस्थितितीत शितलताई पाटील, अध्यक्षा महिमा बहुद्देशीय सामाजिक संस्था नागपुर तसेच वर्षाताई पाटील संस्थापक व अध्यक्षा गगन भरारी बहुद्देशीय सामाजिक संस्था तसेच शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानदेव कापगते सर यांच्या प्रमुख उपस्थिती विविध शैक्षणिक कार्यक्रम आणि शैक्षणिक साहित्य वाटप” कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमाला राजश्रीताई बावनकुळे सदस्य यु.चे.मं., वैष्णवी ताई उडतकर सदस्य यु.चे.मं,वैष्णवीताई येरणे, सदस्य यु.चे.मं,पल्लवी लिचडे सदस्य यु.चे.मं. या सुध्दा आज प्रमुख पाहुणे म्हणुन शाळेत उपस्थित होत्या जि.प.प्राथमिक शाळा गंधारी येथे पोहचली. मग चमुने एक एक करत प्रत्येक वर्गात जाऊन सर्व शालेय विद्यार्थ्यांसोबत सुसंवाद साधला. प्रत्येक विद्यार्थ्यांची वर्षाताई पाटील आणि शितलताई पाटील यांनी आपुलकीने विचारपुस केली. तसेच विद्यार्थ्यांना काही नाविण्यपूर्ण अश्या अक्टिवितीज सांगितल्या तसेच शालेय विद्यार्थांना लैंगिक शिक्षणाबद्दल महत्वपुर्ण असे मार्गदर्शन केले व नंतर विद्यार्थ्यांना चित्रे काढण्यासाठी प्रत्येकाला एक शीट व कलर पेन्सिल देऊन त्यांना चित्र काढायला सांगितली आणि मग चमु गाव भेटीकरिता गावात गेली गाव भेटी नंतर युवा चेतना मंचच्या सर्व सदस्यांनी शालेय विद्यार्थांसोबत खाली बसुन शालेय पोषण आहार जेवण केलं. मग सर्व विद्यार्थ्यांचे जेवण आटोपल्यानंतर शितलताई पाटील अध्यक्षा, महिमा बहुद्देशीय सामाजिक संस्था नागपुर यांच्या अध्यक्षतेखाली “शैक्षणिक साहित्य वाटप” कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांना एक शालेय बॅग, चित्रकला वही, तीन मोठे नोटबुक, पेन्सिल कलर बॉक्स, पेन ,पेन्सिल, स्केल, शार्पनर, खोडरबर, एवढे साहित्य प्रत्येकी वाटप करण्यात आले. यावेळी शितल ताई पाटील यांनी शाळेतील काही होतकरु व गरीब परिस्थिती असलेल्या निवडक विद्यार्थांना दत्तक घेऊन त्यांचे संपुर्ण शिक्षणाचा खर्च करणार असल्याचे प्रकर्षाने बोलले. त्याबद्दल मी ताईचे जि.प.प्राथमिक शाळा गंधारी व संपुर्ण गंधारी/जांभळी येथील गावक-याच्या वतीनं मनस्वी आभार व्यक्त करतो कार्यक्रमाच्या शेवटी युवा चेतना मंच,गगन भरारी बहुद्देशीय सामाजिक संस्था तसेच महिमा बहुद्देशीय सामाजिक संस्था या तिन्ही संस्थाकडुन जि. प. प्राथमिक शाळा गंधारीला स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची फोटो सप्रेम भेट म्हणुन देण्यात आली. तसेच शितलताई पाटील यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.. तसेच सर्व विद्यार्थ्यांना एक बिस्कीट पाकिट व केळी तसेच चॉकलेट चे वाटप करण्यात आले..एकंदरीत आजचा दिवस संपुर्ण शालेय विद्यार्थ्यांसाठी एक अविस्मरणीय दिवस ठरला. सर्व विद्यार्थी हे आनंदात होते मी पुन्हा एकदा शाळेच्या वतीनं युवा चेतन मंच सामाजिक संस्था हिंगणा नागपुर आणि विशेष करुन जगदीश वानोडे,शितलताई पाटील तसेच वर्षाताई पाटील आपलं आभार व्यक्त करतो कि तुम्ही आलात आणि आमच्या चिमुकल्यानां शैक्षणिक साहित्याचं वाटप करुन त्यांना आनंदाचा क्षण दिला या कार्यक्रमाला उपस्थित राजश्रीताई बावनकुळे सदस्य यु.चे.मं, वैष्णवी ताई उडतकर सदस्य यु.चे.मं,वैष्णवीताई येरणे, सदस्य यु.चे.मं,पल्लवी लिचडे सदस्य यु.चे.मं,आकाश फुलकर, जगदीश वानोडे अध्यक्ष यु.चे.म,शितलताई पाटील,वर्षाताई पाटील यावेळी उपस्थित होते.