स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुर्या अडबाले यांचा प्रशासनाने न्यायासाठी समोर यावे ही मागणी व वयोवृद्ध दांपत्याला जाहीर पाठिंबा
सौ. हानिशा दुधे
तालुका प्रतिनिधी बल्लारपूर
बल्लारपूर :– तालुक्यातील पळसगाव या गावातील रहिवासी असून वयोवृद्ध दांपति मारोती लक्ष्मण गोहाने वय 70 ताराबाई मारुती गोहाने वय 65 यांच्या स्वतःच्या मालकीच्या जागेवरती शासनाने दिलेल्या घरकुल योजनेच्या माध्यमातून त्या जागेवरती मकान बांधण्यात आलं होतं आणि त्याच गावातील एक रहिवासी आजी आजोबांना आपल्या बोलण्यातून त्यांची फसवणूक करून त्या रूमवर मध्ये आपलं दुकान चालवत होता पण आता जेव्हा वयवृद्ध दांपत्य यांनी जेव्हा त्यांना घर खाली करायला सांगितलं तेव्हा तो मी रूम खाली करत नाही तुम्हाला जे करायचे ते करा मी खोली खाली करणार नाही असे मनत वयवृद्ध दांपत्यांना उलट तो धमकी देऊ लागला जेव्हा यांना लक्षात आलं की आपण आपल्या जागेवर तो जबरदस्तीने कब्जा केला आणि लाख प्रयत्न करून सुद्धा तो आपली घर खाली करत नाही तेव्हा त्यांनी प्रशासनाचा धावा घेतला परंतु त्यांना कुठेही यश आले नाही. कोणीही त्यांना साथ दिली नाही या वयात जेव्हा त्यांना प्रशासनाकडून न्याय मिळण्याची आशा ची निराशा होत दिसली तेव्हा त्यांनी आपल्या स्वतःच्या घरावरती आपलाच हक्क राहण्यासाठी आपलं घर मिळवण्यासाठी संविधानिक मार्गाने जिल्हा अधिकारी कार्यालय चंद्रपूर याच्यासमोर उपोषणाला बसले आहे परंतु तरी ही प्रशासनाचे लक्ष त्यांच्याकडे अजूनही गेले नाही.
जेव्हा ही बाब स्वाभिमानी शेतकरी संघटना चे जिल्हाध्यक्ष सुर्या अडबाले यांना माहिती मिळाली तेव्हा ते त्या जागेवरती पोहचून वयोवृद्ध दाम्पत्याना धीर देऊन त्यांना जाहीर पाठिंबा दिला व जोपर्यंत त्यांचं हक्काचं घर हे त्यांना मिळणार नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही व मुजोर प्रशासनाला वयोवृद्ध दांपत्याचं त्यांची मागणी ही रास्त आहे आणि त्यांचा हक्काचं घर त्यांना मिळवण्यासाठी शेवटपर्यंत त्यांच्यासोबत राहणार असे आश्वासन दिले व त्यांच्या घरावरती अनाधिकृत हक्कदारी बजवणाऱ्या इसमा वरती प्रशासनाने कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली.