संतोष मेश्राम राजुरा
प्रतिनिधी 9923497800
चंद्रपूर:- जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील १९३७ निजामकालीन फसली नकाशा व १९६४च्या गाव बंदोबस्त नकाशा मध्ये मानीकगड पहाडावरील गावाना सुलभतेने बैलबंडीने त्या काळातील जानारा रस्ता कुसूबीं आसापूर अर्जुनी नोकारी मानोली निस्तार पत्रानुसार कुंसबी येथिल सर्वे नं१५.११.१०.९.८ .२.१या शेतातन पुढे नोकारी येथिल सर्वे.न३३.३४.३५.१७.१८.१०मधून जोडल्या जाते मात्र अल्ट्राटेकच्या मानीकगड युनिट सर्व नियम धाब्यावर ठेवित जंगल मे मंगल करीत कुसूंबीच्या सर्वे न .११.१०.९.८,२, १या जमीनीतुन बि ब्लॉक खदानी खोदून लाईम स्टोन. चुनखड्डी उत्खनन करूण रस्ताच गिळंकृत केल्याचा स्थळ निरीक्षणातुन दिसून येते हि बाब महसुल व खनिकर्म वरिष्ठाना अवगत आहे.
तत्कालीन तहसिलदार श्री होळी यांनी महाराष्ट्र जमिन मह. अधिनियमचे कलम १६१व१६५ अन्वये आदेश दि. ७ जुलै २०२० ला पारीत करूण कंपनीला जानीव करूण दिली. पर्यावरणाची ऱ्हास करत वेस्टमटेरियल नाल्याचे काठावर टाकून जिवती व कुसूंबी नोकारी गडचांइर हा२०ते २५ गावाला जोडणारा हा रस्ता सपाटयाने तयार केल्या जात आहे. महसुल प्रशासन बघ्याची भूमिकेत वावरत असताना वन विभाग देखिल मागे नाही वुक्षतोड करीत रस्ता त्याच्या मातीच्या ढिगारात तुडवित असताना त्याना निर्देशानयेत नसल्याचे नवलच.
शासनाने दि, १७.८.१९८१च्या लिज करारामध्ये भाग क्र३ मुद्दा क्र. ५ मध्ये भाडेपट्टाधारकास सार्वजनिक रस्त्यावर कोनतेही काम करता येणार नाही असे स्पष्ट नमूद असताना. अवैध उत्खनन बांधकाम होत असताना प्रशासनाकडे तक्रारीचा खच पडला मात्र ज्याचेवर नियंत्रण व कार्यवाही चा अधिकार आहे त्याची वागणूक चौकीदारच चोर आहे असे उदगार संतप्त आदीवासीच्या मुखातुन बाहेर पडु लागले सातत्याने होत असलेल्या दिरंगाईमुळे अन्याय विरुद्ध असंतोष आदीवासी कोलाम समाजात खदखदत आहे ऐवढे मात्र खरे.