मधुकर गोंगले, अहेरी तालुका प्रतिनिधी.
अहेरी:- तालुक्यातील राजाराम खां. येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धर्मराव बाबा आत्राम व माजी जिल्हा परिषद अध्यक्षा भाग्यश्रीताई आत्राम, हलगेकर यांच्या कार्यावर विश्वास ठेवून अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.
या प्रसंगी पक्ष प्रवेश कार्यकर्त्यांना आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी शॉल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. या प्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष वृतुराज हलगेकर, जिल्हाअध्यक्ष रविंद्र वासेकर, पंचायत समिती सदस्य हर्षवर्धन आत्राम, अहेरी विधानसभेचे प्रमुख लक्ष्मण येर्रावार, अहेरी तालुका अध्यक्ष श्रीनिवास वीरगोणवार, नगरसेवक अमोल मुक्कावार, माझी ग्रामपंचायत सदस्य कैलास कोरेत, पराग पांढरे, सत्यनारायण मेरगा, सांबय्या करपेत, बालाजी गावडे, बाबुराव कंबागौनीवार, सतय्या गड्डमवार, विनायक आलाम, तिरुपती कुडमेथे, शारदा आलाम, गणपत आत्राम,सूर्यकांत आत्राम सह आदी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट ला www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

