मधुकर गोंगले, अहेरी तालुका प्रतिनिधि
अहेरी:- दिनांक 17 ऑक्टोबर रोजी मुस्लिम धर्मात बकरा ईद व रमजान ईदला ईदगाह येथे मुस्लिम बांधव नमाज पठण करतात. अहेरी तालुक्यातील जीमलगट्टा येथे ईदगाह नसल्याने मुस्लिम बांधवांना नमाज पठण करायसाठी सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध नव्हते त्याकरिता शिवसेना जिल्हाप्रमुख रियाज भाई शेख यांनी अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा येथे या संपूर्ण गोष्टींची दखल घेत शिवसेनेच्या प्रयत्नाने मुस्लिम बांधवांसाठी ईदगाह उभारण्याचे काम त्या ठिकाणी करण्यात आले.
शिवसेना जिल्हाप्रमुख श्री रियाज भाई शेख यांच्या हस्ते ईदगाहचे भूमिपूजन जीमलगट्टा येथे करण्यात आले असून यावेळी आलिम मोहम्मद एहसान यांनी कुरान शरीफचे आयात पडून दुवा केली. यावेळी अहेरी येथील जावेद अली पत्रकार, जमसेट खान, बबलू शेख, प्रभारी पोलीस अधिकारी येरमे, सरपंच पंकज तलांडे, उपसरपंच वेंकठी मेडि, मदनय्या नैताम, पोलीस शिपाई गायकवाड, जहीर शेख, वसंत कन्नाके, अनिल आत्राम, विनोद सडमेक, सगीर शेख, आरिफ शेख, ईफराज शेख, फिरोज पठाण, इशुफ शेख, मोबीन शेख, दस्तगीर शेख, पिरू शेख, शब्बीर शेख, निसार सय्यद, व यावेळी गावकऱ्यासह शेकडो शिवसैनिक तसेच मुस्लिम बांधव उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट ला www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

