वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष बाळू टेंभूणे यांचा आरोप
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली:- जिल्हातील सुरजागड लोहप्रकल्प संबंधाने प्रशासनाच्या वतिने २७ ऑक्टोंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात जनसूनावणी घेण्यात आली परंतु या जनसुनावलीला तेरा गावातील नागरिकांच्या व्यतिरीक्त ईतर कोणालाही आतमध्ये प्रवेश दिल्या गेले नसल्याने वंचित बहुजन आघाडीच्या वतिने प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यात येत असल्याचे जिल्हाध्यक्ष बाळू टेंभुर्णे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात पुढे म्हटले आहे की, एटापल्ली तालुक्यातील बहुचर्चीत सुरजागड लोहखाण क्षेत्रातून लॉयड मेटल्स एनर्जी लिमीटेड कंपनीला खनीज उत्खननाची मर्यादा ३ दशलक्ष मेट्रीक टनवरून १० दशलक्ष मेट्रिक टन करण्याच्या प्रस्तावावर जनसूनावणी घेण्यात आली परंतु या जनसूनावलीला तेरा गावातील नागरिकांच्या व्यतिरीक्त ईतर कोणत्याही नागरिकांना आतमध्ये प्रवेश दिल्या गेले नाही ही लोकशाहीच्या विरोधातील षडयंत्राचा भाग व विडंबना असल्याचे म्हटले आहे.
एटापल्लीत किंवा सुरजागडमध्ये जनसूनावणी घेण्यात यावे अशी जनतेची मागणी असतांना सुद्धा प्रशासन ऐकले नाही, जनतेचे म्हणणे ऐकून घ्यायचेच होते तर प्रशासनाने कडेकोट बंदोबस्तात तेरा गावातील काही मोजक्याच नागरिकांना एक दिवस आधी गडचिरोलीला कां आणले ? आणलेल्या नागरिकांना कोणी विरोधात बोलू नये म्हणून फुस लावविण्यात आली कां ? तेरा गावाच्याच नागरिकांना फक्त प्रवेश देण्यात आला तर ते तेरा गांव जिल्ह्याच्या बाहेरचे आहेत कां? सूरजागड लोह प्रकल्प हा जिल्ह्याचा विषय नाही आहे कां ? गडचिरोली जिल्ह्यातील सामाजीक व राजकीय क्षेत्रातील पदाधिका-यांना प्रवेश कां नाकारण्यात आला ? प्रश्न उपस्थित करणा-या जानकार लोकांना जाणूनबुजून प्रवेशापासून रोखण्यात आले कां ? प्रशासनाला तेरा गावातील नागरिकांच्या साधेभोडेपणाचा फायदा घ्यायचे आहे कां ? लोह प्रकल्प हा जिल्ह्याच्या विकासाचाच जर प्रश्न असेल तर ईतरांना जनसूनावणीपासून कां रोखण्यात आले ? आदि प्रश्नाचा भडिमार सुद्धा बाळू टेंभुर्णे जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी यांनी प्रसिध्दी पत्रकातून केले आहे.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

