युवराज मेश्राम नागपुर जिल्हा प्रतिनिधी
नागपूर: नागपूरात खड्ड्यात साचलेल्या पाण्यात बुडून १२ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. पृथ्वी मार्कंडे असं मृत झालेल्या मुलाचे नाव आहे. डिपट्टी सिग्नल ते शांतीनगर दरम्यान भुयारी मार्गासाठी हा खड्डा खोदला होता. हे खोदकाम सार्वजनिक बांधकाम विभागाने केले होते. पण हे काम गेल्या अनेक दिवसांपासून थांबले होते.
सार्वजानिक बांधकाम विभागाने खोदलेल्या या खड्ड्यात पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचले होते. पृथ्वी हा काल आपल्या मित्रांसोबत खेळायला बाहेर गेला होता. यावेळी त्याचा खड्ड्यात बुडून मृत्यू झाला. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दिरंगाईमुळे निष्पाप मुलाचा बळी गेल्याने परिसरातील नागरिकांचा रोष व्यक्त होत आहे. हलगर्जी करणाऱ्या कर्मचाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली.
डिपट्टी सिग्नल ते शांतीनगर दरम्यान, भुयारी मार्गासाठी हा खड्डा खोदला होता. हे खोदकाम सार्वजनिक बांधकाम विभागाने केले होते. पण हे काम गेल्या अनेक दिवसांपासून थांबले होते. पावसाचे पाणी या खड्ड्यात साचले होते.