Tuesday, April 14, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

अहमदनगर जिल्हा परिविक्षा अधिकाऱ्याला तीन हजाराची लाच घेताना लाचलुचपत विभागाने ठोकल्या बेड्या.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
October 29, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
अहमदनगर जिल्हा परिविक्षा अधिकाऱ्याला तीन हजाराची लाच घेताना लाचलुचपत विभागाने ठोकल्या बेड्या.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

विश्वास त्रिभुवन, अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी

अहमदनगर:- येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एका लाचखोर अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागच्या पथकाने लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. त्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. तक्रारदाराविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्याची सुनावणी न्यायालयात सुरू होती. तक्रारदाराविरुद्ध आणखी एकही गुन्हा दाखल नाही, असा अहवाल देण्याकरिता महिला व बालकल्याण विकास कार्यालयातील अधिकार्‍याने तीन हजार रुपयांची लाच स्वीकारल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली. महेश अनंतराव पाटील वय 52, जिल्हा परिविक्षा अधिकारी, महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, सर्जेपुरा, अहमदनगर असे आरोपीचे नाव आहे.

अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांच्याविरुद्ध 2020 मध्ये एमआयडीसी पोलिस ठाण्यात मारामारीचा गुन्हा दाखल होता. या गुन्ह्याची सुनावणी न्यायालयात सुरू होती. न्यायालयाने तक्रारदार यांच्याविरुद्ध आणखी काही गुन्हे दाखल आहेत काय याची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हा परिविक्षा अधिकारी यांना दिले होते. त्याअनुषंगाने तक्रारदार यांच्याविरुद्ध आणखी इतर गुन्हे दाखल नसल्याबाबतचा अहवाल न्यायालयात पाठविण्यासाठी आरोपी महेश पाटील याने तीन हजारांची लाच मागितली. त्यानंतर तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अहमदनगर यांच्याकडे तक्रार केली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पथकाने 27 ऑक्टोबर रोजी पडताळणी केली असता आरोपी पाटील याने तीन हजारांच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून 27 ऑक्टोबर 2022 रोजी नगर शहरातील सर्जेपुरा येथील कार्यालयात लाचेचा सापळा आयोजित केला असता आरोपी महेश पाटील याने तक्रारदाराकडून तीन हजारांची लाच स्वीकारली असता त्याला रंगेहाथ पकडले. याबाबत तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक हरिष खेडकर यांच्या मार्गदर्शनखाली पोलिस निरीक्षक शरद गोर्डे, पोलिस हवालदार संतोष शिंदे, पोलिस नाईक रमेश चौधरी, विजय गंगुल, रवींद्र निमसे, वैभव पांढरे, बाबासाहेब कराड, महिला पोलीस नाईक संध्या म्हस्के यांच्या पथकाने केली. दरम्यान, आरोपीला न्यायालयाने 31 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे. पोलिस तपासात आणखी काही बड्या अधिकार्‍यांची नावे निष्पन्न होण्याची शक्यता आहे.

आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

नाशिक महिलांच्या माध्यमातून हनी ट्रॅप मध्ये पुरुषांना फासवायचे, एका महिलेला पोलिसांनी ठोकल्या बेड्या.

Next Post

नाशिक रेल्वेमध्ये नोकरीला लावून देण्याची हमी देत पाच तरुणांना बोगस नियुक्तीपत्र देऊन तब्बल 55 लाखांची फसवणूक.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
नाशिक रेल्वेमध्ये नोकरीला लावून देण्याची हमी देत पाच तरुणांना बोगस नियुक्तीपत्र देऊन तब्बल 55 लाखांची फसवणूक.

नाशिक रेल्वेमध्ये नोकरीला लावून देण्याची हमी देत पाच तरुणांना बोगस नियुक्तीपत्र देऊन तब्बल 55 लाखांची फसवणूक.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In