✒️प्रविण जगताप, प्रतिनिधी
वर्धा:- राज्य शासनाने दिवाळीपूर्वी जिल्हातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी मदत जाहीर केली होती पण दिवाळी होऊन आठ दिवस झाल्या नंतर पण ती शेतकऱ्याच्या खात्यात जमा झाले नाही. त्यामुळे सरकार आणि बैक प्रशासनावर मोठे प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.
राज्य शासनाने निधी उपलब्ध करून दिला आहे पण प्रशासन आणि बँकने तो निधी अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा झाली नाही. अनेक शेतकरी आजही मदतीपासून वंचित आहे. बँकां मार्फत हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यास विलंब होत असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. हिंगणघाट येथील स्टेट बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, एचडीएफसी बैंक, सेंट्रल बँक या बँकाचा समावेश आहे. काही बँकानी तर सुरूवातीला हा मदत निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात काही कारणास्तव टाळटाळ करीत हा निधी परत पाठविण्यात आल्याची माहिती आहे.
सरकाने निधीची उपलब्धता करून दिली असताना बँकेकडून शेतकऱ्यांचे खात्यावर रक्कम जमा करण्यास विलंब का? सेलू तालुक्यात व हिंगणघाट तालुक्यातील असा प्रश्न शेतकरी करीत आहे . पण बँकांचे चुकीचे धोरणामुळे या शेतकऱ्यांवर मदतीपासून वंचित राहण्याची वेळ आली. शेतकरी पैसे जमा होईल, दिवाळीपूर्वीच हा निधी शेतकऱ्यांना मिळायला हवा होता. पण बँकांचे चुकीचे धोरणामुळे या शेतकऱ्यांवर मदतीपासून वंचित राहण्याची वेळ आली. शेतकरी पैसे जमा होईल, या आशेने बँकाचे उंबरठे झिजवत आहे.

