राजेंद्र झाडे चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर:- 2019-2020 काळात महाराष्ट्रात यूती सरकार अस्तित्वात होती. तेव्हाचे राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय धोटे असतांना एन.यु.टी. अंतर्गत वढोली-भंगाराम, तळोधी-पोडसा, चेक- आष्टा, गोंडपिपरी-धाबा-हिवरा या प्रमाणे रोड मंजुर करण्यात आले. रोड मंजुर करतेवेळेस एक नियम पाळण्यात आला कि, या मंजुरीला कदापी रद्द करता येणार नाही यासाठी मोठ्या प्रमाणात निधी देखील उपलब्ध करून दिला होता.
अडीच वर्षांत महाविकास आघाडी सरकार सत्तेत आले असता जनतेच्या विकास कामाकडे लक्ष न देता स्वतःचा विकास साधण्यात वेळ घालवित आहेत. भाजपा सरकारच्या कार्यकाळातील आमदारांच्या विकास कामांचा विद्यमान आमदारांना विसर पडला असुन धाबा क्षेत्रातील एकही प्रश्न विधान सभेत मांडून विकासा भिमुक गोष्टींना सोडविण्याचा प्रयत्न करण्यात आलेला नाही. कुंभकर्णी झोपेत असतांना सरकार पडली व झोपेतुन उठलेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून जनतेची दिशाभुल करण्याचे प्रयत्न सूरू आहे.परंतु जनता डोळे झाकून नाही हे त्यांना कदाचित माहीत नसावं.धाबा-तोहगाव जि.प. क्षेत्रामध्ये जनतेने तीनदा भाजपा वर विश्वास ठेवून उमेदवार निवडून दिले याचेच फळ म्हणून ना.सुधीर मुनगंटीवार यांनी मोठ्या प्रमाणात या क्षेत्राला निधी उपलब्ध करून विकासकामांना गती मिळवुन दिली.
अडीच वर्षाच्या कार्यकाळात आघाडी सरकार या क्षेत्रासाठी एवढी मोठी निधी उपलब्ध करून देण्याचे सौजन्य सूद्धा दाखविले नाही. परंतू आयत्या बिडात नागोबा प्रमाणे 1 नोव्हेंबर 2022 पासून सूरू होणाऱ्या कामाचे श्रेय लाटण्यासाठी हालचाली सूरू झाले.असं म्हणणे वावगे ठरणार नाही.

