Wednesday, May 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

बीड: राजस्थान येथून देवदर्शन करून परतणार्‍या बोरा कुटूंबावर काळाचा घाला, पोखरीजवळ पुलावरून कार कोसळली.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
November 2, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
बीड: राजस्थान येथून देवदर्शन करून परतणार्‍या बोरा कुटूंबावर काळाचा घाला, पोखरीजवळ पुलावरून कार कोसळली.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी

बीड/आष्टी:- जामखेडा येथून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. राजस्थान येथून देवदर्शन करून परतणार्‍या बोरा कुटूंबियांची गाडी पोखरीच्या पुलावरून खाली कोसळली. यामध्ये जामखेड येथील प्रतिष्ठीत व्यापारी जागीच ठार झाले. तर गाडीतील अन्य चौघे जण गंभीररित्या जखमी झाले. ही घटना आज सकाळच्या सुमारास घडली असून जखमींना उपचारासाठी नगर येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले. घटनास्थळी आष्टीचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक नामदेव धनवडे, भरत गुजर, बी.ए.वाणी यांनी धाव घेतली होती.

जामखेड शहरातील प्रसिध्द व्यापारी असलेले महेंद्र शांतीलाल बोरा हे काही दिवसापूर्वी आपल्या कुटूंबासमवेत राजस्थान याठिकाणी देवदर्शनाला गेले होते. ते रात्री विमानाने पुणे विमानतळ याठिकाणी आल्यानंतर त्यांची गाडी क्र.एम.एच.16 ए.टी.8807 ने आपल्या कुटूंबासमवेत पुण्याहून पहाटे जामखेड कडे निघाले होते. त्यांची गाडी सकाळी 8 वाजताच्या सुमारास नगर-जामखेड रोडवरील पोखरी फाट्या जवळ आली होती. ड्रायव्हरला पोखरीजवळ सोडले आणि मुलगा भूषण गाडी चालवत होता. पोखरीच्या धोकादायक वळणावर टायर फुटल्याने गाडी पुलावरून खाली पलटी झाली. यामध्ये महेंद्र बोरा वय 58 वर्ष यांचे जागीच निधन झाले. तर त्यांच्या गाडीमध्ये असलेल्या त्यांच्या पत्नी रेखा महेंद्र बोरा वय 52 वर्ष, सुन जागृती भूषण बोरा वय 28 वर्ष, नात लियाशा भूषण बोरा वय 6 वर्ष, मुलगी हे गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने जामखेड येथील समर्थ हॉस्पीटल याठिकाणी दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नगर येथे हलवण्यात आले आहे. त्यांचा मुलगा भूषण शांतीलाल बोरा (वय 34 वर्ष हा किरकोळ जखमी झाला. मयत महेंद्र बोरा यांचे शवविच्छेदन जामखेड ग्रामीण रूग्णालयात करण्यात आले. बोरा यांच्या अपघाती निधनाने जामखेड परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी पोलिस उपनिरीक्षक नामदेव धनवडे, भरत गुजर, वाणी यांनी जावून घटनेचा पंचनामा केला.

Previous Post

महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांचा कुटील डाव, धाबा तोहोगाव जिल्हा परिषद क्षेत्रातील विकास कामांचा श्रेय लाटण्याचा प्रयत्न: स्वप्नील अनमुलवार

Next Post

नाशिक: शासकीय कर्मचाऱ्यांची त्याच्या राहत्या घरातच गळा आवळून हत्या, आरोपी कोण??

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
नाशिक: शासकीय कर्मचाऱ्यांची त्याच्या राहत्या घरातच गळा आवळून हत्या, आरोपी कोण??

नाशिक: शासकीय कर्मचाऱ्यांची त्याच्या राहत्या घरातच गळा आवळून हत्या, आरोपी कोण??

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In