✒️वैशाली गायकवाड उपसंपादक
पूणे:- शहरांतील औंध रोड या ठिकाणी वेणूवन बूद्ध विहार येथे आंबेडकरी विचाधारी महिलांचा मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या मिळाव्यात समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा, पुणे शहरातील भिडे वाडा बचाव कृती समितीच्या महिला आणि वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्या महिलांचा सहभागी झाल्या होत्या.
आज देशात मोठ्या प्रमाणात सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक राजकीय प्रश्न निर्माण झाले आहे. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार पेरत आंबेडकरी चळवळ गतिमान करण्याची आज मोठी आवश्यक भासत आहे. त्यामुळे हा विचार सर्वजण माणसानं पर्यंत पोहचवण्यासाठी वेणूवन बूद्ध विहार येथे आंबेडकरी विचाधारी महिलांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता.
आज शिक्षित सुधारित लोकांनी समोर येऊन समाजातील गरीब, अनाथ, हौतकरू विद्यार्थी यांना मदत करावी. जेणे करून आपण आपली पुढील पिढी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार “शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा” या विचारावर उभी राहावी. त्याच मुळे आज पुणे शहरातून ही चळवळ सुरू झाली करण्यात आली आहे. असे यावेळी आपल्या मार्गदर्शनातून व्यक्त्यानी सांगितल.
हा मेळावा यशस्वी करण्यासाठी महानंदा डाळींबे, शकुंतला शेलार, प्रतिभा कांबळे, सारिका फडतरे, विमल मस्के, अनिता चव्हाण (पुणे शहर अध्यक्ष) हसिना आपा सय्यद (पुणे शहर उपाध्यक्ष) सह अनेक महिलांनी या मिळाव्या साठी परिश्रम घेतले.
या मिळाव्यात चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चा सत्राच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा सूजाता ओव्हाळ (उपाध्यक्ष महिला पूणे जिल्हा पूर्व) या होत्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सूनिता रोकडे यांनी केले तर प्रास्ताविक राजश्री सरोदे यांनी केले. तसेच पाहुण्यांचे स्वागत महानंदा डाळींबे (महिला उपाध्यक्ष पूणे शहर) यांनी केले. सदर कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून भिकाजी कांबळे यांनी मार्गदर्शन केले. सदर मेळाव्याला भरपूर प्रतिसाद मिळून चारशे ते पाचशे महिलांचा सहभाग होता व येणाऱ्या काळामध्ये विविध सामाजिक प्रश्नांवर काम करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

