अनिल अडकिने सावनेर तालुका प्रतिनिधी
सावनेर:- शहरातील महात्मा फूले नगर मधील साईं मंदिर येथे त्रिपुरी पोर्णिमेचा कार्यक्रम भक्ती भावाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. त्यावेळी शेकडो भाविकभक्त उपस्थिती होते.
त्रिपुरी पौर्णिमेला साई मंदिर कमेटीच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रात्री ९ वा. साईं महिला भजन मंडळाचा भजनाचा कार्यक्रम पार पडला. मध्यरात्री १२ वाजता टीपूर जाळन्यात आला. आरती, पूजा अर्चना झाल्या नंतर कार्यक्रमास उपस्थित सर्व साईं भक्तांकरीता अल्पोहर व चहाचे आयोजन करण्यात आले होते. मंदिर कमेटीच्या वतीने फटाक्याची आतिशबाजी करण्यात आली. तसेच कार्यक्रमास परिसरातील साईं भक्तानी मोठ्या संखेने गर्दी केली होती.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता रामभाऊजी मोवाडे, प्रशांत ठाकरे, प्रकाश बूटे, निलेश चटूले, ध्यानेश्वर बोबडे, नंदू भोयर, ललित जुनघरे, हर्ष ठाकरे, दिलीप ढूंडे, रमेश दिवटे, गौरव बूटे, तुषार निंबालकर, चेतन ठाकरे, सौ चंद्रकला मोवाड़े, सौ. पार्वता अडकीने, सौ. वेणुबाई ठाकरे, सौ मंजुलाबाई खंगार, सौ. शालू कुथे, घोळसे बाई शामलता खोंडे, काळेबाई व इतर साईभक्तांनी सहकार्य केले.

