राहुल फुंदे, शिर्डी प्रतिनिधी
शिर्डी:- सर्व पक्षीय शिर्डी ग्रामस्थ श्री साईबाबा संस्थानमध्ये आपल्या विविध मागण्या घेवुन मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या भेटीला आले होते. यावेळी शिर्डी ग्रामस्थ व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यामध्ये सौहार्द पुर्ण वातावरणात चर्चा झाली.श्री साई बाबा मंदिराची सुरक्षा व प्रशासनाचे कामकाज यांना बाधा न येवु देता, ज्या मागण्या मान्य होण्यासारख्या होत्या, त्या मागण्या ताबडतोब मान्य करण्यात आल्या. तसेच काही मागण्या टप्याटप्याने स्विकारता येतील, असे आश्वासन संपूर्ण गावक-यांना याप्रसंगी देण्यात आले.
यावेळी प्रामुख्याने गावक-यांच्या मागणीनुसार गर्दीच्या अनुषंगाने समाधी मंदिरातील समाधी पुढील काच काढून दर्शन देणे. तसेच गर्दीच्या वेळी मंदिर विभागाने कमी उंचीची काच लावणे व व्दारकामाईत आतील बाजुस भाविकांना प्रवेश देणे, ग्रामस्थांसाठी गेटवर येणे-जाणेकरीता मार्ग मोकळा करणे. श्रींची आरती चालु असताना गुरुस्थान मंदिर येथे परिक्रमा करु देणे, जास्तीचे बॅरीगेट काढणे आणि श्री साईसच्चरित हे काही भाषेमध्ये कमी आहे ते लवकरात लवकर उपलब्ध करुन देणे इत्यादी बाबत चर्चा झाली.
तसेच संस्थान प्रशासनाने गावक-यांच्या मागणी विषयी सकारात्मक भुमिका दर्शविली याबाबत सर्व उपस्थित गावक-यांनी आनंद व्यक्त केला. तसेच सकारात्मक वातावरणात सभा समाप्त झाली. याप्रसंगी राजेंद्र गोंदकर, सुधाकर शिंदे, प्रताप जगताप, शिवाजी गोंदकर, विजय जगताप, सचिन कोते, ज्ञानेश्वर गोंदकर, महेंद्र शेळके, प्रकाश शेळके, संजय शिंदे, रमेश गोंदकर, सचिन शिंदे, संदीप सोनवणे, अशोक कोते, सुजित गोंदकर, विजय गोंदकर, सुमित शेळके, अशोक गोंदकर, गजानन शेर्वेकर, अमित शेळके व अमृत गायके आदी ग्रामस्थ उपस्थित होते.