सौ. हनिशा दुधे, बल्लारपूर तालुका प्रतिनिधी
मोबा. 9764268694
बल्लारपूर:- मोहसिनभाई जव्हेरी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बल्लारपूर येथे कायदे विषयक माहिती मार्गदर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यात कायदे विषयक माहिती मार्गदर्शनाचा अनेकांनी लाभ घेतला.
मोहसीनभाई जव्हेरी कन्या विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय बल्लारपूर येथे दिनांक: 11 नोव्हेंबर 2022 रोजी आजादी का अमृतमहोत्सव निमित्त ” 31 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबर ला “न्यायालया मार्फत” कायदेविषयक माहिती मार्गदर्शनाचा हा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री. तुषारजी वाजे दिवाणी व फौजदारी न्यायधीश कनिष्ठ स्तर तथा न्याय दंडाधिकारी प्रथम श्रेणी, श्री. पी. एच. जोशी सहदिवाणी व फौजदारी न्यायधीश कनिष्ठ स्तर न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी, ॲडव्होकेट श्री. संदेश हस्ते उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षा शाळेच्या प्राचार्या सौ.प्रतिभा कोतकेलवार मॅडम या होत्या.
मंचावर उपस्थित सर्व पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कायदेविषयक माहिती मार्गदर्शन अंतर्गत ॲडव्होकेट संदेश हस्ते यांनी प्रास्ताविकपर कायदेविषयक माहिती दिली. प्रमुख पाहुणे श्री. तुषारजी वाजे दिवाणी व फौजदारी न्यायधीश, श्री. पी. एच. जोशी सहदिवाणी व फौजदारी न्यायधीश यांनी सक्तीचे शिक्षण, शिक्षणाचे महत्व, वेळेचे महत्व, संविधानाची माहिती, राष्ट्रीय शिक्षण दिन व कायदेविषयक माहिती अतिशय प्रभावीपणे सांगितली. शाळेच्या प्राचार्या सौ कोतकेलवार मॅडमनी अध्यक्षीय मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने वर्ग 8 ते 12 वीचे विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन सौ. आशा ढेंगळे मॅडमनी केले तर आभार प्रदर्शन सौ. सीमा धाडवे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.