श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी
बीड:- शहरामध्ये मागील अनेक वर्षांपासून हॉटेल व्यवसायामध्ये तसेच सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होणारे वाय जनार्दन राव यांची नुकतीच मराठवाडा चेंबर्स ऑफ ट्रेड व कॉमर्स औरंगाबाद सचिव पदी बिनविरोध निवड झाली आहे. मराठवाडा चेंबर्स ऑफ ट्रेड व कॉमर्स २२-२४ चे अध्यक्ष आदेशपाल चाबडा यांनी निवड जाहीर करुन शुभेच्छा दिल्या.
मराठवाडा चेंबर्स ऑफ ट्रेड व कॉमर्स औरंगाबाद ची काही दिवसांपूर्वी कार्यकारणीची बैठक झाली. या बैठकीला २२-२४ चे अध्यक्ष आदेशपाल चाबडा, माजी अध्यक्ष मानसिंग पवार, सत्यनारायण लाहोटी यांच्यासह अन्य पदाधिकारी यांची उपस्थिती होती. या बैठकीमध्ये २२-२४ चे सचिव पदासाठी वाय जनार्धन राव यांची एकमताने व बिनविरोध निवड झाली. मराठवाडा चेंबर्स ऑफ ट्रेड व कॉमर्स औरंगाबाद च्या कार्यकारिणींमध्ये बीड जिल्ह्याला वाय जनार्दन राव यांच्या माध्यमातून प्रथमच सचिव पदाची जबाबदारी मिळाली आहे. या बैठकीमध्ये राव यांची निवड करून अध्यक्ष आदेशपाल चाबडा यांनी पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. बीड शहरासह जिल्ह्यातील व्यापारी यांच्या विविध समस्या व अडचणी संदर्भात मराठवाडा चेंबर्स ऑफ ट्रेड व कॉमर्स या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल ग्वाही नूतन सचिव वाय जनार्दन राव यांनी या निवडीबद्दल दिली. राव यांच्या कार्याची दखल घेत मराठवाडा चेंबर्स ऑफ ट्रेड व कॉमर्स औरंगाबाद यांनी कार्यकारिणी मध्ये सचिव पदाची बिनविरोध निवड केल्याबद्दल बीड शहरासह जिल्हाभरातील विविध व्यापारी, प्रतिष्ठित नागरिक, विविध संघटना पदाधिकारी यांनी राव यांना शुभेच्छा दिल्या.