युवराज मेश्राम नागपूर जिल्हा प्रतिनिधी
नागपूर:- 3 जुलै 2022 ते पासून 20 जुलै 2022 पर्यंत अतिदृष्टी झाल्यामुळे उमरेड, भिवापूर,कुही,तालुक्या मध्ये शेतकऱ्यांचे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.ग्रामीणच्या काही गावांमध्ये लोकांच्या घरामध्ये पाणी शिरून घरे शुध्दा पडली आहे.त्यामुळे महाराष्ट्र सरकारने त्वरित पंचनामे करून ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांवर असलेले कर्ज आणि अटीदुष्टीच्या काळात शेतकऱ्यांचे पिकांचे अतोनात नुकसान झाल्यामुळे त्यांना त्वरित मदत करण्यात यावी अशा प्रकारचे निवेदन वंचित बहुजन आघाळी उमरेड विधान सभा क्षेत्रातील हर्षानंद भगत नागपूर जिल्हा सचिव ग्रामीण यांच्या नेतृवात तहशिलदार साहेब संदीप पुंडेकर यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी संजय मेश्राम सदस्य नागपूर जिल्हा ग्रामीण, संजीव लोखंडे कामगार संयोजक उमरेड तालुका कामगार अध्यक्ष, विनोद वाघमारे, हर्षु मस्के, गुलास करप, दिनेश कांबळे, शरद आटे, शिवसागर तांबे, मनीष गायकवाड, शैलेश लोखंडे, रमेश लांबसोंगे, प्रेम लांबसोंगे, मुकेश बहादुरे, समीर गोरघाटे, जितेंद्र सवाईकर, संदेश मेश्राम, साहिल शेरकी, सिद्धार्थ फुले इत्यादी उपस्थित होते.