देवेंद्र सिरसाट, हिंगणा तालुका प्रतिनिधी
नागपूर:- शाळेतील जिवण हे वेगळेच असते. लहानपणातील मित्रांना भेटीची आवड सर्वांनाच असते. पण मोजकेच लोक पुढाकार घेतात. असाच पुढाकार महेश लोखंडे यांनी घेतला आणि महात्मा गांधी शाळा वानडोंगरी येथे कार्यक्रम घडवून आणला.
महात्मा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा वानाडोंगरी येथे 96/97 मध्ये 10 वर्गात शिक्षण घेत असतांना विद्यार्थी आणि विद्यार्थीनी एकत्र शिक्षण घेत होते. नंतर सर्वच आप आपल्या क्षेत्रात गेले. आपण एकत्र यावे शाळेत कार्यक्रम आयोजित करावा, असा विचार महेश लोंखडे यांच्या मनात आला आणि मित्रांचा शोध घेतला शाळेत ऐकत्र आले. विद्यार्थी जिवणातील आठवणी ताज्या केल्या या वेळी शिकवीणारे शिक्षकही यात रमले शाळेचे मुख्याध्यापक महाजन सर, लांबट,भुजाडे, जेठे मंडम, सातपुते मंडम, दशरथ बाबु, आतिष सर या वेळी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन महेश लोखंडे, अनिल होनाळे, प्रशान्त भोसले, भारती खोबे, नितीन परतकर, शरद मनवर, प्रवीण डाखळे, किशोर सोरते, संतोष कन्हेरकर, पुष्पा वांढरे, छाया नखाते, शरद कांबळे, सुनीता घोंगडे, सविता मेश्राम, संजय मडावी, संगिता मोरे हे विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी शिक्षकांनी मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक महेश लोंखडे यांनी केले आभार प्रशांत भोसले यांनी मानले.

