मुकेश चौधरी, कार्यकारी संपादक
वर्धा:- जिल्हातील हिंगणघाट येथील मुक्तांगण स्कूल मधील विद्यार्थीनी कुमारी धनश्री हेमंत भोयर हिने तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा जिंकली व जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धा मध्ये आपले स्थान पटकावले.
मुक्तांगण स्कूल शिकणारी कुमारी धनश्री हेमंत भोयर हिने आपल्या मेहनत आणि कुस्ती मध्ये काही तरी मोठ करण्याच्या इच्छा शक्ती मुळे तिने हे यश संपादन केले. त्यामुळे भविष्यात ती मोठी कुस्ती पट्टू म्हणून संपूर्ण राज्यात आपला ठसा उमठवेल अशी आशा हिंगणघाटकर धनश्री हेमंत भोयर यांच्या कडून करत आहे.
या प्रसंगी विद्यार्थीनी कु. धनश्री हेमंत भोयर आणि शाळेची स्पोर्ट टिचर संजना चौधरी यांच्या हया यशाबद्दल संस्था अध्यक्षा डॉ. मशाक्षेत्री मॅडम, स्वाती वानखेडे मॅडम, संदेश मुन तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली ठाकरे मॅडम यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या.

