सतिश म्हस्के, जालना जिल्हा प्रतिनिधी 9765229010
जालना:- निवृत्तीवेतन धारकासाठी दरवर्षी त्यांचा हयातीचा दाखला सादर करणे गरजेचं असते. दरवर्षी 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबरदरम्यान हयातीचा दाखला सादर करणे आवश्यक असते. जर हे प्रमाणपत्र सादर केले नाही, तर पेन्शन थांबू शकते. 80 वर्षांवरील पेन्शनधारकांना 1 ऑक्टोबरनंतर हयातीचा दाखला सादर करण्याची सुविधा मिळाली. अशा प्रकारे अशा पेन्शनर्सला ऑक्टोबर आणि नोव्हेंबरच्या स्वरूपात प्रमाणपत्र सादर करण्यासाठी दोन महिने मिळतात. सरकारने पूर्वीच्या तुलनेत अनेक प्रकारे हयातीचा दाखला सादर करण्याची सुविधा दिली. आता पेन्शनरला यासाठी जास्त त्रास घेण्याची गरज नाही. निवृत्ती वेतन धारक त्यांचा हयातीचा दाखला सादर करू शकतील.
महाराष्ट्र राज्य शासनाचे सर्व निवृत्ती वेतन धारक, कुटुंब निवृत्ती वेतन धारक दरवर्षी माहे नोव्हेंबर मध्ये हयातीचे दाखले बँकेत सादर करण्यात येतात. त्या अनुषंगाने हयात प्रमाणपत्राची संगणकीकृत यादी कोषागार कार्यालयातून बँकेत पाठवण्यात आली असून, सर्व निवृत्ती वेतन धारक, कुटुंब निवृत्ती वेतन धारक यांचे हयात असल्याचे प्रमाणपत्र तारीख 1 नोव्हेंबर नंतर संबंधित बँकेत जाऊन तारीख 30 नोव्हेंबर पूर्वी यादीमध्ये स्वाक्षरी करून द्यावेत तसेच स्वाक्षरीबरोबर पँन नंबर व आधार नंबर नमूद करावेत, व बँकांनी निवृत्ती धारकांची यादीमध्ये त्यांचे नावासमोर स्वाक्षरी करावी.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

