मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी
नाशिक:- नाशिक येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. शाळकरी मुलींची छेड करणाऱ्या एका टवाळखोरांला मुलींच्या पालकांनी आणि जमावाने बेदम चोप दिला. नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसराध्ये ही घटना घडली आहे.
शाळा सुटल्यानंतर मुली घराच्या दिशेने जात असतांना एक्सप्रेस इन हॉटेल जवळ मुलीची एका तरुणाने छेड काढली होती, वारंवार ही घटना घडत असल्याने मुलींनी त्यांच्या पालकांना ही घटना सांगितली. पालकांनी मात्र लागलीच संबंधित व्यक्तीचा शोध घेत त्याला विचारणा केली. त्यावेळी त्याने उडवाउडवीचे उत्तर दिल्याने त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी मोठ्या प्रमाणात नागरिक जमल्याने त्यांनीही बेदम माराहाण केली आहे. तरुणाचे अक्षरशः कपडे फाटे पर्यन्त तरुणाला मारहाण करण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात नागरिक जमले होते. तरुणाला बेदम मारहाण करतांना पाहून ज्याला शक्य होईल तो येऊन मारहाण करून जात होता. उपस्थित नागरिकांनी मात्र यावेळी व्हिडिओ काढून सोशल मीडियावर शेयर करण्यास सुरुवात केली होती. इंदिरानगर पोलीस ठाण्यात याबाबत माहिती देऊन तरुणाला नागरिकांनी पोलीसांच्या ताब्यात दिले आहे.
शाळेच्या आजूबाजूला टवाळखोरांचा नेहमीच वावर असतो, त्यामुळे पोलीसही तिथे पेट्रोलिंग करत असतात, त्यामुळे टवाळखोर मुलं मुलींना घराच्या दिशेने जातांना छेडछाड करण्याचा प्रयत्न करत आहे. नाशिक शहरातील पाथर्डी फाटा परिसरातील एक्सप्रेस इन हॉटेल जवळ मुलीची छेडछाड करण्याची घटना समोर आली असून यामध्ये तरुणाला बेदम मारहाण केल्याचीही बाब समोर आली आहे.
शाळा सुटल्यानंतर दोन मुलींची छेड एका टवाळखोराने काढली होती. त्यावेळी एक मुलीने घर गाठून पालकांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर पालकांनी लागलीच संबंधित ठिकाण गाठून तरुणाला मारहाण केली आहे. पालकांकडून मारहाण सुरू असतांना नागरिकही मोठ्या प्रमाणात जमले होते. त्यांनीही यामध्ये माराहण केली, यामध्ये तरुणाचे कपडे फाटे पर्यन्त त्याला मारहाण करण्यात आली आहे.
या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी इंदिरानगर पोलीस ठाण्याचे पोलीसही दाखल झाले. त्यांनी टवाळखोर तरुणाला ताब्यात घेतले असून नंतर त्या तरुणाने मद्यसेवन केल्याचेही समोर आले आहे. एकूणच नाशिक शहरातील या घटनेबाबत चर्चा होत असून तरुणाला मारहाण केल्याचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर शेयर केले जात असून पालकांचे कौतुक केले जात आहे.

