सौ. हनिशा दुधे, बल्लारपूर तालुका प्रतिनिधी
बल्लारपूर:- दोन दिवसांपूर्वी बल्लारपूर शहरातील प्रसिद्ध शॉपिंग कॉम्प्लेक्स व्यंकटेश एम्पायर मध्ये बिअर शॉप सुरु झाल्याची बातमी समजताच व्यंकटेश एम्पायर कॉम्प्लेक्स मधील सर्व दुकानदार व कार्यालयातील लोकांनी एकत्र येऊन या बिअर शॉपीच्या विरोध करायला सुरुवात केली.
अंपायर कॉम्प्लेक्स हे शहरातील एक व्यापारी संकुल आहे. या कॉम्प्लेक्स मध्ये बँक आहे. दहावी – बारावीच्या विद्यार्थाचे ट्युशन क्लासेस या कॉम्प्लेक्स मध्ये असून यात मोठ्या प्रमाणात मुली आणि मुल शिकवणी वर्गासाठी येतात, कॉम्प्लेक्स मध्ये दुकानात काम करणाऱ्या महिलांची संख्या मोठी आहे. आणि तिथे भारतीय जनता पक्षाचे जनसंपर्क कार्यालय आहे. शिवसेनेचेही जनसंपर्क कार्यालय आहे आणि गजानन सुपर मार्केट आहे. एक मोठे किराणा दुकान आहे. महिलांच्या वस्तूंचे आणि ठोक कपड्यांच्या एक मोठे दुकान आहे त्यामुळे या कॉम्प्लेक्समध्ये रोज मोठ्या प्रमाणात येतात.
या कॉम्प्लेक्सच्या मागील बाजूस महिला आणि पुरुषांसाठी सर्वांसाठी एकच स्वच्छतागृह आहे. ज्याच्या शेजारीच 5 फुटाच्या दूरवर शेजारीच लपून बिअर शॉपी सुरू होणार होती, याला संकुलातील सर्व लोकांनी विरोध केला. या विषयावर भाजपचे शहराध्यक्ष काशिनाथ सिंह यांच्याशी लोकांनी संपर्क साधला असता त्यांनी ताबडतोब ठाणेदार उमेश पाटील यांना याबाबत सांगितले, त्यानंतर पोलीस विभागातील लोकांना माहिती दिल्यानंतर उत्पादन शुल्क विभागाचे प्रमुख पाटील यांना या विषयाची माहिती देण्यात आली आणि त्यांनी आश्वासन दिले की आमचे लोक जाऊन त्या जागेची पाहणी करतील आणि त्याच प्रसंगी, आज त्यांचे दोन कर्मचारी इथे आले होते.
उत्पादन शुल्क विभागाच्या पवार यांनी सुद्धा मान्य केले की ही जागा खरोखरच संवेदनशील आहे. हे दुकान इथे नसावे, संकुलातील सर्व लोकांसह ते दोघेही प्रतिनिधी म्हणून ते आले होते. उत्पादन शुल्क विभागाच्या कर्मचाऱ्यांना निवेदन देण्यात आले व तेथून लगेचच फोनवर बोलून उत्पादन शुल्क विभागाचे प्रमुख श्री.पाटील यांनी परवा आपली टीम येऊन या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी करेल असे आश्वासन दिले.
या संकुलातील सर्वांची एकच मागणी आहे की शॉपिंग कॉम्प्लेक्स मध्ये बिअर शॉपीसह वॉशरूम उघडल्यावर नक्कीच मोठा अनुचित प्रकार घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे याला दुसरीकडे स्थलांतरित करावे. अन्यथा काही अनुचित प्रकार घडला तर? अशी चिंता नागरिकांनी व्यक्त केली. कोणतीही अनुचित घटना घडण्याआधी सर्व लोकांनी स्वाक्षरी करून निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात असे म्हटल आहे की, तत्काळ या बियर शॉपीला दुसऱ्या स्थिकाणी हस्तांतरित करून दुसऱ्या ठिकाणी हटवले जात नाही तोपर्यंत त्याला मोठ्या प्रमाणावर विरोध केला जाईल.
या संकुलाच्या मालकाने हे दुकान राजुरा येथील एका व्यक्तीला विकल्याचे प्राथमिक माहितीत सांगण्यात आले असून, या संकुलात दारू, बिअर किंवा मांसाहाराचे दुकान सुरू करू नये, अश्या अटीवर हे दुकान विकले होते. पण या व्यक्तीने सर्व नियम पायाखाली तुडवत शहरातील तरुण पिढीला व्यसनाधिन बनवण्याच्या जणू चंग बांधला आहे असे तरी यावरून दिसून येत आहे कॉम्प्लेक्स मध्ये असे दुकान सुरू झाल्यास मानवतेसाठी आणि विशेषत: शहरातील मुलींसाठी निश्चितच मोठा धोका निर्माण होऊ शकतो, ज्याची कदाचित संबंधित अधिकाऱ्यांना कल्पना नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, दुकान मालकाने चार ते पाच महिन्यांपूर्वी बीअर शॉपीची परवानगी घेतली असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षकांकडून आलेल्या कर्मचाऱ्यांनी दिली.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348