✒️अकोला जिल्हा प्रतिनिधी
अकोला:- संविधान दिनानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर संकल्प कला क्रीडा व बहुउद्देशीय शिक्षण संस्था अकोला तथा बायजुस ट्युशन सेंटर अकोला व महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य तसेच भाग्योदय आरोग्य व बहुद्देशीय शिक्षण संस्थेच्या लिंक वर्कर स्कीम यांच्या संयुक्त विद्यमाने अशोक वाटीका येथे, २६ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ११:०० ते सायंकाळी ०५:०० वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे.
या शिबिरात पांढरा काविळ, पिवळा काविळ, मधुमेह, थाईरॉईड, सि.बि.सि, एस.टि.आय, टि बी, बि.पी, एच.आय.व्ही, किडनी टेस्ट, यकृत चाचणी, मधुमेह, थाईरॉईड सीबीसी चाचणी ,STI,TB,HIv, आदिसह अनेक आजार तपासणी मोफत मध्ये होणार आहे.
या शिबिराचे उद्घाटन शासकीय सर्वोपचार रुग्णालयातील अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभिये मॅडम यांच्या हस्ते होणार आहे. तर प्रमुख अतिथी म्हणून जुने शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सेवानंद वानखडे, बायजुस ट्युशन सेंटर अकोलाचे शाखा व्यवस्थापक पियुष वहनमाने, रोशन तायडे, सामाजिक कार्यकर्ता विशाल भोसले, रुग्णसेवक संघटनेचे जिल्हा महासचिव समिर खान, महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष प्रवीण भोटकर, संकल्प कला क्रीडा व बहुउद्देशीय शिक्षण संस्था अकोलाचे संस्थापक अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ता, रुग्णसेवक उमेश सुरेशराव इंगळे व रुग्णसेवक संघटनेचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
तरी समस्त अकोला शहरातील नागरिक, पत्रकार बंधु, विद्यालय, महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनी, अशोक वाटीकेत येणाऱ्या सर्व नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटनेचे राज्य महासचिवतथा संकल्प कला क्रीडा व बहुउद्देशीय शिक्षण संस्था अकोला चे संस्थापक अध्यक्ष उमेश सुरेशराव इंगळे यांनी केले आहे.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

