✒️एरंडोल प्रतिनिधि
एरंडोल:- माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीची बैठक दिनांक १९ रोजी शनिवारी येथील शासकीय विश्रामगृहात पार पडली. प्रारंभी उपस्थित नवीन सभासदांचे व मान्यवरांच्या सत्कार करण्यात आला. या बैठकीत पदाधिकाऱ्यांचा सभासद नोदणी फॉर्म भरून घेण्यात आले व अडीअडचणी व समस्याविषयी माहिती देण्यात आली तसेच समितीचा महत्वाचा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
यावेळी जिल्हाध्यक्ष समाधान पाटील, ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, कार्याध्यक्ष शेख कासीम शेख चाँद, जिल्हा संघटक चेतन पाटील, जिल्हा सचिव महेश न्हाळदे, जळगांव तालुका अध्यक्ष भगवान मोरे, एरंडोल तालुका अध्यक्ष बाबाजी पाटील, पारोळा तालुका उपाध्यक्ष गोपाल पाटील आदी उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

