मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी
नाशिक रोड:- नाशिक रोडच्या वादग्रस्त रस्त्याचे पुन्हा डांबरीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. दत्तमंदिरापासून गायकवाड मळ्यापर्यंत रस्ता निकृष्टपणे बनवण्यात आला होता. या संदर्भात माजी नगरसेविका संगीता गायकवाड आणि नागरिकांनी आवाज उठवला होता. सध्या या रस्त्याचे पुन्हा डांबरीकरण करत असल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
पावसाळ्याआधी कामे उरकायची म्हणून हा रस्ता जलद गतीने बनवण्यात आला होता. यामध्ये गुणवत्ता नियंत्रण अजिबात करण्यात आले नव्हते.
पहिला पाऊस पडल्यानंतर सबंध रस्ता उखडला होता. त्यामुळे नागरिकांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली होती. या संदर्भात माजी नगरसेविका संगीता गायकवाड आणि नागरिकांनी आवाज उठवला होता.
यामध्ये बांधकाम अभियंता आणि बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांवर ताशेरे ओढण्यात आले होते. हा वाद थेट आयुक्तांपर्यंत गेला होता. सध्या या रस्त्याचे डांबरीकरण पुरेपूर करण्यात आले आहे. गुणवत्ता नियंत्रण विभागाच्या अधिकारीही या रस्त्याची पाहणी करून गेल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

