मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
अहेरी:- तालुक्यातील आलापल्ली येथील हजरत टिपू सुलतान फाउंडेशन आलापल्लीच्या वतीने स्थानिक जामा मस्जिद परिसरात हजरत टिपू सुलतान यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी उद्घाटक म्हणून पोलीस उपनिरीक्षक चव्हाण होते तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते उमाजी गोवर्धन होते आणि राष्ट्रपती पुरस्कार कुर्शीद शेख, अब्दुल सत्तार, मस्जिदचे अध्यक्ष मेहबूब शेख, के जी एन मस्जिदचे अध्यक्ष इमरान सिद्दीकी, जाकिर शेख व स्वप्नील तावाडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रम प्रसंगी मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आला तसेच जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मान्यवरांनी टिपू सुलतान यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला व मार्गदर्शन केले तसेच रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते यात अहेरी उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचारी सरिता वाघ, शिरीन कुरेशी निखिल कोंडापरतिवार, शरद बांबोडे, मन्ना शेख उपस्थित होते. या प्रसंगी एकूण 23 जणांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली.
या कार्यक्रमाला मुजफ्फर शेख , इमरान शेख , मुजाहिद शेख , फैज़ान शेख , मज़र कुरेशी , राशिद शेख , राहिब पठान , अदनान कुरेशी, फराझ शेख उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी केले.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348